धुळे, दि. 7- तालुक्यातील नव भदाणे येथील रहिवासी नाना काळू श्रीराम ऊर्फ ठेलारी या 36 वर्षीय शेतक:याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. ठेलारी यांच्यावर बँकेचे 1 लाख रुपयांचे कर्ज होते. त्यात शेतात पिक न आल्याने कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून ते होते. त्यातून त्यांनी अखेर आत्महत्या केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
धुळे जिल्ह्यात कर्जबाजारी तरुण शेतक:याची आत्महत्या
By admin | Published: April 07, 2017 11:49 AM