लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाºया धुळ्याच्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पुण्यात घडली. या तरुणावर बुधवारी शोकाकूल वातावरणात येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून त्याबाबतचा तर्कवितर्क लावले जात आहेत. चितोड रोडवरील राजहंस कॉलनीत राहणारा अमोल रमेश श्रीराव (२२) हा तरुण पुण्याच्या सिंहगड परिसरामधील अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता़ रविवारी त्याचा वाढदिवस होता़ वाढदिवस असल्याने त्याचे आई-वडील आणि दोघी बहिणींनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या़ फोनवर त्याच्या आवाजात फरक जाणवत असल्याचे अमोलच्या वडिलांना जाणवले़ त्याच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी सकाळी पुन्हा अमोलला फोन लावण्यात आला़ पण, त्याने फोन उचलला नाही़ वारंवार फोन करुनही उपयोग होत नसल्याने त्याबाबत काळजी वाढली़ त्यामुळे त्याच्या मित्रांशीही संपर्क साधण्यात आला होता़ पण, अमोलबद्दल काहीही माहिती मिळत नव्हती़ अमोल राहत असलेल्या घराच्या शेजाºयांनी फोन करुन अमोलच्या पालकांना या घटनेची माहिती दिली़ अमोलने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे कळताच येथील राजहंस कॉलनीत शोककळा पसरली़
धुळे येथील तरुणाची पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 6:57 PM
गळफास घेतला : राजहंस कॉलनीत शोककळा, धुळ्यात अंत्यसंस्कार
ठळक मुद्देअमोल हा सिंहगडच्या कॉलेजमध्ये शिकत असताना पुण्याच्या बिबवेवाडी भागातील सेक्टर नंबर ३ मध्ये तो रुम करुन राहत होता़ त्याच्या सोबत कोणी मित्र वगैरे नव्हता. त्याने आत्महत्या का केली, काय कारण असावे, असे विविध प्रश्न आता उपस्थित होत आहेत. अमोलचे वडील हे तालुक्यातील कुसुंबा स्टेट बँकेच्या शाखेत अधिकारी आहेत़ आई देखील नोकरी करते़ त्याला दोन बहिणी असून एकीचे लग्न झालेले आहे़ तो एकलुता एक होता़त्याचा मृतदेह धुळ्यातील त्याच्या निवासस्थानी आणण्यात आला़ बुधवारी शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.