लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : टंचाईसदृश्य गावातील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीतही पोषण आहार देण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील धुळ्यासह शिंदखेडा, साक्री तालुक्यातील ४५४ शाळांमधील तब्बल ५७ हजार ८२५ विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीत पोषण आहार देण्यात येणार आहे.ज्या गावांचा टंचाई सदृश्य गावांमध्ये समावेश झालेला आहे, त्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत उन्हाळ्याच्या सुटीतही पोषण आहार देण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत. त्यादृष्टीने पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार १ मे ते १५ जून २०१८ या कालावधीत देण्यात येणार आहे.धुळे जिल्ह्यात यावर्षी १९१ गावांचा टंचाईग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यात सर्वाधिक गावे धुळे तालुक्यात आहे. त्या गावांची संख्या १५१ आहे. त्याखालोखाल शिंदखेडा तालुक्यातील ३६ व साक्री तालुक्यातील ४ गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शिरपूर तालुक्यातील एकाही गावाचा टंचाईग्रस्त गाव म्हणून समावेश नाही.धुळे तालुक्यात पहिली ते आठवीच्या ३८५ शाळा आहेत. त्यातील ५१ हजार १५८ विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येईल. त्याखालोखाल शिंदखेडा तालुयातील ५९ शाळांमधील ५ हजार ५५८ तर साक्री तालुक्यातील १० शाळांमधील १ हजार १०९ विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येणार आहे. पोषण आहार शिजविण्यासाठी स्वयंपाकी व मदतनीसांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे. धुळे तालुक्यासाठी ६०२, शिंदखेड्यासाठी १०१, तर साक्री तालुक्यातीलशाळांमध्ये पोषण आहार शिजविण्यासाठी २१ स्वयंपाकी व मदतनीसांची नियुक्ती केलेली आहे.४० टक्के उपस्थितीउन्हाळ्याच्या सुटीत अनेक विद्यार्थी बाहेर गावी जात असतात. त्यामुळे फक्त ४० टक्के विद्यार्थीच या योजनेचा लाभ घेत असतात. त्यादृष्टीने पोषण आहाराचे साहित्य शाळांना वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
धुळे जिल्ह्यातील ५८ हजार विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात पोषण आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 11:51 AM
जिल्ह्यात १९१ टंचाईग्रस्त गावे: पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार या योजनेचा लाभ
ठळक मुद्देजिल्ह्यात १९१ टंचाईसदृश्य गावे४५४ शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार पोषण आहार४० टक्के उपस्थिती गरजेची