धुळे : स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा, बारापत्थर चौकासह ठिकठिकाणी खासगी रिक्षा, सिक्स सिटर वाहनांनी वळण रस्त्यावर अतिक्रमण केले आहे़ त्यामुळे बेशिस्त वाहतुकीने कळस गाठला असल्याचे ‘लोकमत’ चमूने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. मात्र तरी देखील महापालिका व शहर वाहतूक पोलीसांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे़बेशिस्त वाहतूकीमुळे प्रत्येकाला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो़ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एखाद्याचा अपघातात बळी गेल्यास अधिकारी नेमकी कारवाई कुणावर करणार असा प्रश्न धुळेकरांचा पडला आहे. वाढती रहदारी, वाहतूक पाहाता आणि वळण रस्ते वाहतूकीचा भार कमी करण्याची गरज असतांना रस्त्यावर बिनधास्त पार्किंग, थांबे करण्यात आले आहे.वाहतूक ताणावर उपायशहराची लोकसंख्या व वाहन संख्येत वाढीमुळे वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे़ त्यामुळे पॉर्किंग प्रश्न निर्माण झाला आहे़ हा प्रश्न सोडविण्यासाठी मनपाच्या भुखंडासह खाजगी जागांवर सशुल्क वाहन तळाची व्यवस्था केल्यास हा प्रश्न सुटू शकतो़अशी होऊ शकते विभागणीदेवपूर १, देवपूर २ वॉर्ड, मोहाडी, दत्त मंदिर चौक, देवपूर बस नेहरू चौक, सुभाषनगर आदी ठिकाणी पॉर्किंग झोन तयार केल्यास परिसरातील वाहनाच्या पॉर्किंगचा प्रश्न सोडविता येवू शकते़ नियमीत पॉर्किंग होणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना दरपत्रक निश्चित करून या सुविधेचा मासिक पास उपलब्ध करून दिल्यास मनपाला आर्थिक फायदाही मिळविता येवू शकतो़ त्यामुळे दुकानासमोर वाहनांची पॉर्किंग व रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविता येऊ शकेल.सिग्नल यंत्रणेचा बोजवाराशहरातील सिग्नल यंत्रणेचा बोजवाºयामुळे परिवर्तनाची आस धरून असलेल्या शहरास सध्या वाहतूक कोंडीच्या समस्येने चांगलेच ग्रासले आहे. बेशिस्त वाहनचालक, वाढलेली गर्दी, दिरंगाईने होणारी रस्त्याची कामे आणि त्यामुळे अरुंद झालेले रस्त्यामुळे चौकात वाहतूक कोंडी होते. मुख्य रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणा केवळ देखाव्यासाठी असल्याचे चौकात वाहतूक कोंडीच्या समस्या उद्भवते. मनपाने शहरातील पॉर्किंगचा प्रश्न सोडविल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविता येवू शकतो अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली़
बेशिस्त वाहतुकीने गाठला कळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 10:04 PM