धुळे : तालुक्यातील नेर येथील ग्रा.पं.च्या ग्रामविस्तार अधिकाºयाची बदली करून नये अशा मागणीचे निवेदन ग्रा़पं़सदस्य व ग्रामस्थांकडून जि.प.सीईओंना देण्यात आले़ तर त्यांची बदली करा यासाठी दुसºया गटाने बेमुदत आंदोलन सुरू केले आहे़ ग्रामविस्तार अधिकारी संजय देवरे यांची कार्यप्रमाणाली अत्यंत प्रिय आहे़ ग्रामपंचायतीत येणाºया प्रत्येक व्यक्तीचे समाधान व अडचणी सोडविण्यात त्यांची मदत होत आहे़ त्यांच्या कार्यपध्दतीची दखल घेऊन गावातील हगणदारी मुक्तीसाठी देवरे यांचा सन्मान झाला आहे़ नेर ग्राम पंचायतीकडून अपहार झाल्याची खोटी तक्रार विरोधकांकडून करण्यात आली होती़ याबाबत झालेल्या चौकशीत कामात अनियमितता व अपहार झाल्याचे आढळून आले नाही़ तरी प्रामाणिक अधिकाºयांची बदली करू नये, अशा मागणीचे निवेदन ग्रा.पं. सदस्यांकडून जि.प. सीईओंना देण्यात आले़ त्यावर धर्मा माळी, दिनेश सोनवणे, लताबाई कोळी, नाना सोनवणे, अरूणाबाई भिल, कल्पना बहिरमे, कविता आखाडे, पंढरीनाथ दामू शंखपाळ, कडू भिल, नारायण बोढरे, संजय चौधरी, सतिंष बोढरे, मांगू मोरे, मुन्नीबाई मोरे आदीचे नावे आहेत़ बदली करा अन्यथा आमचे उपोषण थांबणार नाहीतालुक्यातील नेर ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी देवरे यांची बदली यासाठी जिल्हा प्रशासनाकडे वेळावेळी निवेदन देण्यात आले आहे़ परंतू अद्याप कुठलाही दखल न घेता देवरे यांची बदली करण्यात आलेली नाही़ बदली करावी या मागणीसाठी बुधवार पासुन बेमुदत उपोषण करण्यात येत आहे़ बदली करा अन्यथा आमचे उपोषण थांबणार नाही असा इशारा आंदोलकांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिला आहे़ निवेदनावर राजधर अमृतसागर, संजय सैदाणे, योगेश गवळे, किरण माळी, विशाल देशमुख, नागेश महाले आदीच्या स्वाक्षºया आहेत़
ग्रामविस्तार अधिकाºयाच्या बदलीसाठी सुंदोपसुंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 10:40 PM