धुळे : शहरातील देवपूर भागात १८ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या शालेय विद्यार्थी सनी साळवे खून खटल्यातील प्रमुख आरोपीपैकी वैभव अंबादास गवळे याने औरंगाबाद उच्च न्यायालयात दुसºयांदा जामीन अर्ज दाखल केला होता. दाखल केलेला जामीन अर्जावर युक्तीवाद झाला आणि तो फेटाळण्यात आला़ सदरच्या गुन्ह्यात वैभव गवळे याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे मूळ फिर्यादीचे वकील अॅड़ निलेश देसले यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले़ न्यायालयाने खून खटल्याचा गांभीर्याने विचार करत वैभव अंबादास गवळे या आरोपीचा जामीन अर्ज न्या. नलावडे व न्या. आर. बी. अवचट यांच्या खंडपिठाने फेटाळून लावला. तसेच मूळ फिर्यादीतर्फे अॅड़ निलेश देसले यांनी जोरदारपणे युक्तीवाद केला़ त्यांना अॅड़ विशाल साळवे यांनी सहकार्य केले.सनी साळवे खून खटल्यातील आरोपी वैभव गवळेच्या जामीन अर्जावर अॅड़ अमोल सावंत, अॅड़ रवींद्र आडे यांनी जामीन अर्जावर कामकाज पाहिले. यापूर्वीही गवळे या आरोपीचा जामीन अर्ज धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यावेळी मूळ फिर्यादीकडून अॅड़ निलेश दुसाने यांनी कामकाज पाहिले होते. गुन्ह्याची गंभीरता व गुन्ह्यात प्रत्यक्ष आरोपींचा सहभाग पहाता औरंगाबाद उच्च न्यायालयाने दुसºयांदा वैभव गवळे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
सनी साळवे खून प्रकरणात आरोपीचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 10:12 PM