ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.7 - धुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश जाहीर झालेल्या गावांना शासनातर्फे दिल्या जाणा:या विविध सुविधांचा आधार मिळणार असल्याचे महसूल विभागाने नुकतेच जाहीर केले आह़े त्यात जिल्ह्यातील 366 गावांचा समावेश आह़े
दुष्काळसदृश गावांना शासन धोरणानुसार लाभात जमीन महसूलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कजर्वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33़5 टक्के सुट, शालेय- महाविद्यालयीन विद्याथ्र्याच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतक:यांच्या शेती पंपांची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती अनु™ोय असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी कळविले आह़े दुष्काळसदृश गावांना या उपाययोजनांमुळे मोठा दिलासा मिळू शकतो. या गावांमध्ये धुळे, साक्री व शिंदखेडा तालुक्यातील 366 गावांचा समावेश आह़े