नंदुरबार : बालवैज्ञानिकांची शोधक वृत्तीची भरारी पाहणा:यांना अचंबित करणारी ठरली. अणुविज्ञान, सौर आणि जल उर्जा, अंतराळविज्ञान यासह इतर वैज्ञानिक क्षेत्रातील उपकरणे मांडून विद्याथ्र्यानी जिल्हा विज्ञान प्रदर्शनात लक्ष वेधून घेतले आहे. तीन दिवस चालणा:या या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार डॉ.हीना गावीत यांच्या व आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. जिल्हास्तरीय 17 व्या विज्ञान प्रदर्शन कोठली आश्रमशाळेत सोमवारपासून सुरू झाले. औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. जिल्हाभरातील शाळांमधून 104 उपकरणे सहभागी झाली आहेत. त्यात प्राथमिक गटातून 24, माध्यमिक गटातून 24, शिक्षक निर्मित अध्यापन साहित्याची प्राथमिक व माध्यमिकची प्रत्येकी सहा, लोकसंख्या शिक्षण प्राथमिकचे प्रत्येकी 18, प्रयोगशाळा सहायकनिर्मित उपकरण सहा, व्यवसाय मार्गदर्शन दोन अशा उपकरणांचा समावेश आहे. सहभागी उपकरणांमध्ये अंतराळ विज्ञान, अणुविज्ञान, पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण यासह इतर विषयांवरील उपकरणांचा समावेश आहे. प्रत्येक तालुकास्तरावरील प्रदर्शनातून निवडण्यात आलेली उपकरणे जिल्हा प्रदर्शनात सहभागी झाली आहेत. उद्घाटनपर भाषणात बोलताना खासदार डॉ.हीना गावीत यांनी सांगितले, विज्ञानाच्या प्रगतीचा आढावा घेऊन वैज्ञानिक दृष्टय़ा देशाच्या प्रगतीविषयी त्यांनी विविध उदाहरणे दिली. रोबेटिक सजर्री परदेशात बसून भारतात करता येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शाळांमधूनही अशा उपक्रमांमधून नवनवीन प्रयोग हाताशी घेऊन लहान शास्त्रज्ञ तयार व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नवीन वस्तूंचा शोध लावून शोधवृत्ती, नावीन्यपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी सांगितले, विद्याथ्र्याना त्यांच्या कलेनुसार वाव देऊन आवडत्या क्षेत्रात त्यांना प्रगती करू द्यावी. आश्रमशाळा, वसतिगृहांनी आपल्या इमारतींवर सोलर पॅनल उभारून वीज निर्मितीचा प्रकल्प राबवावा. प्रकल्प कार्यालयाने आश्रमशाळांमध्ये विशेषत: दुर्गम भागातील शाळांमध्ये असे उपक्रम राबविले तर त्यातून आदिवासी विद्याथ्र्याना ते सोयीचे होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी जी.एन.पाटील यांनी केले. त्यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभागी उपकरणांची माहिती दिली. या वेळी व्यासपीठावर सरपंच विलास वळवी, सहायक प्रकल्प अधिकारी आर.आर. पाटील, ए.आर. तांबोळी, माध्यमिक शिक्षणाधिकारी जी.एन.पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील उपस्थित होते. या वेळी माजी जि.प.सदस्य प्रकाश गावीत, उपशिक्षणाधिकारी दिनेश देवरे, गटशिक्षणाधिकारी सी.के. पाटील, रमेश गावीत, किस्मत पाडवी, विष्णू गुरुजी, राजेंद्र शर्मा आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपाली पाटील, उषा राजपूत यांनी केले. आभार सुनील भामरे यांनी मानले.
बालकांची शोधवृत्ती अचंबित करणारी
By admin | Published: January 12, 2016 12:49 AM