आॅनलाइन लोकमतधुळे : मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन करणाºया विना अनुदानित शिक्षकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्याचा धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने निषेध केला आहे. लाठी हल्ला करणाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली.अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांनी वेतन अनुदान मिळण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू केले. मात्र २६ रोजी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी लाठीहल्ला केला, त्यांना निलंबित करण्यात यावे. गेल्या २० दिवसांपासून आंदोलन सुरू असतांना शिक्षणमंत्र्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. शासनाने या शिक्षकांची तातडीने दखल घेऊन, विनावेतन काम करणाºया शिक्षण क्षेत्रातील सर्वांचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी करण्यात आली.यावेळी संघटनेचे संजय पवार, विलासराव पाटील, महेश मुळे, डी. जे.मराठे, अशोक गिरी, प्रा. बी. ए. पाटील, बी.डी. भदोरिया, एस. बी. महाजन, रवींद्र टाकणे, सुनील गिरी, एन. एस. कापडीस, आर. के.पाटील यांच्यासह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षकांवर लाठी हल्ला करणाऱ्यांना निलंबित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:02 PM