आॅनलाइन लोकमतधुळे : पगारवाढसह इतर मागण्यांसाठी एस.टी. कर्मचाºयांनी पुकारलेल्या अघोषित संपात सहभागी झाल्याबद्दल धुळे विभागातील २० चालक वाहक यांचा निलंबित करण्यात आले. तर चार सहायक हेल्पराची सेवा समाप्त करण्यात आलेली आहे.८ व ९ जून १८ रोजी राज्यातील एस.टी. कर्मचाºयांनी संप पुकारलेला होता. संपात चालक, वाहक, सहायक अनुकंपा तत्वावरील कर्मचारी सहभागी झाले होते. कर्मचाºयांच्या संपामुळे धुळे विभागातील नऊ आगारांमधील शेकडो बसफेºया रद्द झाल्या होत्या. यामुळे विभागाचे लाखो रूपयांचे उत्पन्न बुडाले होते. कर्मचाºयांनी संप पुकारल्याबद्दल काही कर्मचाºयांना नोटीसा बजावण्यात आलेल्या होत्या. दरम्यान यापैकी शहादा आगाराचे १७ व शिरपूर आगाराचे ३ चालकांना निलंबित करण्यात आलेले आहे. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाºयांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.चार जणांची सेवा समाप्तसंपात सहभागी झालेल्या शिरपूर आगारातील चार सहायक हेल्परांची सेवा समाप्त करण्यात आलेली आहे. हे कर्मचारी महामंडळाच्या सेवेत सहभगाी होऊन अवघे १५-२० दिवसच झाले होते. मात्र ते अघोषित संपात सहभागी झाल्याने, त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आलेले आहे. दरम्यान सेवा समाप्त केलेल्या कर्मचाºयांची नावे सांगण्यास विभागीय कार्यालयाने असमर्थता व्यक्त केली.
संपात सहभागी झालेले धुळे विभागातील २० चालक, वाहक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:40 AM
एस.टी. महामंडळ: चार कर्मचाºयांची सेवा समाप्त
ठळक मुद्देकर्मचाºयांनी केला होता संप संपात सहभागी कर्मचाºयांना बजावल्या होत्या नोटीसविभागातील २० कर्मचाºयांवर केली कारवाई