ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.26- शेतक:यांना कजर्माफी हवी असून त्यांच्या भावना सरकार जाणते, त्यामुळे कजर्माफी देऊच परंतु तत्पूर्वी शेतीच्या शाश्वत विकासावर भर दिला जात असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केल़े तालुक्यातील मांडळ येथे झालेल्या शेतकरी शिवार यात्रेदरम्यान शेतक:यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला़
राज्यात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काढलेल्या संघर्ष यात्रेला विद्यमान सरकारकडून शेतकरी शिवार यात्रेने प्रत्युत्तर दिले जात असून या शिवार यात्रेचा प्रारंभ गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लातूर येथे झाला़ याच यात्रेचा भाग म्हणून भाजपची धुळे तालुक्यातील मांडळ परिसरात एका शेतात जाहीर सभा झाली़ त्यावेळी दानवे बोलत होत़े या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, रोहयो व पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, लक्ष्मण सावजी, किशोर काळकर, लखन भतवाल, मनोहर भदाणे, बापू खलाणे, प्रा़अरविंद जाधव, गोंविदराव केंद्रे, किशोर संघवी, भाऊसाहेब देसले व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होत़े
सदर कार्यक्रमाला सुरूवात होताच काही शेतक:यांनी उभे राहून कजर्माफीची मागणी करीत गोंधळ घालण्यास सुरूवात केली़ रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मनोगत व्यक्त करतांना, गोंधळ घालणारे पुढारी काँग्रेसचे असून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे कजर्माफी होऊ शकत़े त्यानंतर पुन्हा गोंधळ घालत प्रशासकीय कामांमध्ये अडचणी येत असल्याचे सांगितल़े अखेर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे बोलण्यासाठी उभे राहिल़े ग्रामीण भागाची नस दानवे यांना माहित असून ज्यांचे आयुष्य काँग्रेस-राष्ट्रवादीत गेले ते सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत़ परंतु असा गोंधळ घातला तर काँग्रेस-राष्ट्रवादीची एकही सभा होऊ देणार नाही, असा इशारा डॉ़ भामरे यांनी दिला़ विरोधी पक्षासह विद्यमान सरकारचे प्रगतिपुस्तक देणार असल्याचेही डॉ़ भामरे म्हणाले व ग्रामीण विकासाशी निगडीत योजनांची माहिती त्यांनी दिली़ त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी शेतक:यांना मार्गदर्शन केल़े ते म्हणाले की, सरकारला शेतक:यांची चिंता असून कजर्माफीची मागणी पूर्ण केली जाणार आह़े परंतु पुन्हा शेतक:यांवर कर्ज घेण्याची वेळ येऊ नये यासाठी विविध योजना सरकार राबवित आह़े पूर्वीचे सरकार 50 टक्के नुकसान झाले तर दुष्काळ जाहीर करायचे पण आता 33 टक्के नुकसान झाले तरी दुष्काळ जाहीर होतो, पीक विम्यासाठी अल्प रक्कम भरावी लागते, शेतक:यांना गहू 2 रूपये किलो व तांदूळ 3 रूपये किलोने उपलब्ध करून दिला़ मागेल त्यांना वीज, शेततळे व विहीरी दिल्या़ जमिनीची पोत खराब होऊ नये यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून नाला बंडींगची कामे केली़ युरीयाचा तुटवडा दूर झाला असून आता निम कोटेड युरीया आला आहे, त्यामुळे भेसळ करता येत नसल्याचेही दानवे म्हणाल़े सभेला शेतक:यांचा चांगला प्रतिसाद लाभला़