ऑनलाईन लोकमत
नेर, ता. धुळे , दि.4- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका:यांनी रविवारी सकाळी 9 वाजता सुरत-नागपूर महामार्गावरील लोणखेडी फाटय़ानजीक रास्ता-रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे सुरत-नागपूर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी शेतक:यांनी घोषणाबाजी करत येथील परिसरत दणाणून टाकला.
शनिवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक:यांच्या कोअर कमिटीच्या बैठकीत काही मागण्या मान्य असल्याचे सांगत त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. परंतु, लेखी हमी न देता केवळ आश्वासन दिल्यामुळे अनेक शेतक:यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या या ध्येय धोरणच्या विरोधातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोणखेडी फाटय़ावर शनिवारी पुतळा दहनही केले होते. त्यानंतर आज पुन्हा रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष जगदीश पाटील, उपाध्यक्ष गोकूळ खिंवसरा, बाळू सोनवणे, धुळे तालुकाध्यक्ष शिवाजी देशमुख, शांताराम पाटील, तात्या पाटील, हिलाल पाटील आदी उपस्थित होते.
सुरळीत व्यवहार सुरू
दरम्यान, रविवारी सकाळपासून पिंपळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा व शिरपूर येथील बाजारपेठेत सकाळपासून सुरळीत व्यवहार सुरू होता. मात्र, भाजीपाल्याची आवक बाजारपेठेत कमी असल्यामुळे आजही शेतक:यांना जादा दराने भाजीपाला खरेदी करावा लागल्याचे चित्र दिसून आले.