भूषण चिंचोरेधुळे: महानगरपालिकेच्या स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या स्वयंभू कंपनीचे व्यवस्थापक अभिजीत फडतरे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी जुन्या महानगरपालिकेच्या इमारतीत घडली. शहरातील स्वच्छतेबाबत राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले व कार्यकर्ते फडतरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते.
यावेळी फडतरे व कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला त्यानंतर कार्यकर्त्यांनी सोबत आणलेले अंडी व शाई फडतरे यांच्या अंगावर फेकली तसेच मारहाण केली. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.