शिंदखेडा : शिंदखेडा शहरात आज राष्ट्रवादी पक्षातर्फे सोमवारी सकाळी एटीएम मशीनची प्रतीकात्मक अंत्ययात्रा तहसील कचेरीवर नेण्यात आली. या वेळी उपस्थित पदाधिका:यांनी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास दूर करावा, यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार रामकृष्ण पाटील, एन. सी. पाटील, विठ्ठलसिंग गिरासे, ज्योती पावरा, सत्यजित सिसोदे, कलावतीबाई माळी, देवीदास कोळी, अरुण देसले, सुरेश अहिरराव, प्रकाश चौधरी, संदीप पाटील, किरण जाधव, मोतीलाल पाटील, सुयोग भदाणे, रवींद्र माळी, राहुल कचवे, नीलेश निकम, कैलास ठाकरे, प्रदीप पाटील, विजय महाले उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून एटीएम मशीनची अंत्ययात्रा काढून तहसील कचेरीत नेण्यात आली. तेथे तहसीलदार गायत्री सैंदाणे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर एटीएम मशीनची होळी करण्यात आली.
शिंदखेडा येथे एटीएमची प्रतीकात्मक अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2017 11:29 PM