आॅनलाइन लोकमतधुळे : गेल्या काही दिवसात जिल्ह्यात पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. पोलिसांवर हल्ला करणाºयांवर आळा घालावा, व हल्लेखोरांवर कारवाई करावी अशी मागणी पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात शिरपूर तालुक्यात दुर्बळ्या गावात तसेच शिंदखेडा येथे भगवा चौकात, शिंदखेडा तालुक्यातील धावडे गावामध्ये पोलिसांवर हल्ला झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. पोलीस हे कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम करीत असतात. पोलीस अधीक्षकांनी वेळीच पाऊल उचलले असते, तर पोलीस अधिकारी, कर्मचाºयांवर हल्ला होण्याच्या घटनांना आळा बसला असता. दरम्यान पोलीस अधिकारी, कर्मचाºयांवर हल्ले होणार नाही या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. संबंधित गावातील दोषी नागरिकांवर गुन्हे दाखल करून, कडक कारवाई करण्यात यावी. कारवाई न झाल्यास पोलीस बॉईज असोसिएशन संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे. यावेळी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप वाघ, महेश पोतदार, शहराध्यक्ष इम्रान शेख, मोहसीन शेख, फारूख काझी, गणेश पाटील, अॅड. इम्रान शेख, जमीर शेख आदींच्या स्वाक्षºया आहेत.
धुळे जिल्ह्यात पोलिसांवर हल्ला करणाºयांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 5:47 PM
पोलीस बॉईज असोसिएशन : निवासी उपजिल्हाधिकाºयांना दिले निवेदन
ठळक मुद्देजिल्ह्यात पोलिसांवर झाले हल्लेहल्ले करणाºयांवर कडक कारवाईची मागणीकारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा