धुळे : स्वामिनारायण संस्थेने बांधकाम परवानगी घेतलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर अतिक्रमण करून 11 रस्ते बंद केले आहेत़ तरी याप्रकरणी नगररचना अधिनियम 52, 53 व नगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 260 व 478 अन्वये कारवाई करावी, अशी मागणी आमदार अनिल गोटे यांनी आयुक्तांकडे केली आह़े स्वामिनारायण संस्थेने बांधकाम परवानगीसाठी सादर केलेल्या प्रस्तावात ट्रस्टच्या मालकीच्या 1़51 हेक्टर जागेवर 4 हजार 600 चौ.मी. क्षेत्रावर बांधकाम दर्शविण्यात आले आह़े मनपाने 2 हजार 65 चौ.मी. क्षेत्रावर बांधकाम करण्यास परवानगी 10 फेब्रुवारी 1995 ला दिली आह़े बोचनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम संस्था (स्वामिनारायण मंदिर ट्रस्ट) यांनी बेकायदेशीरपणे दत्त मंदिर ते राष्ट्रीय महामार्ग तीनर्पयत विकास आराखडय़ात मंजूर असलेला 40 मीटर रुंदीचा सार्वजनिक रस्ता विनापरवानगी बंद केला आह़े तसेच दुस:या बाजूला मोठी दगडी भिंत उभारली आह़े सदर बंद केलेल्या डीपी रस्त्यावर 3़90 बाय 13 चौ.मी. एवढे प्रचंड मोठे गेट आह़े तसेच स्वच्छतागृह, बुकस्टॉलचे बांधकाम, किचन स्टोअर व तळमजला, पाण्याची टाकी, वॉचमन रूम, संत आश्रमचे बेकायदेशीर बांधकाम केले आह़े तसेच केवळ तळमजल्यास बांधकाम परवानगी असताना पहिल्या मजल्याचे बांधकाम झाले आह़े याबाबत आपण पुराव्यांसह तक्रार केली असून स्वामिनारायण ट्रस्टच्या बेकायदेशीर बांधकामावर नगररचना अधिनियम 52, 53 व मनपा अधिनियम 1949 च्या कलम 260 व 478 अन्वये कारवाईची मागणी गोटे यांनी केली आह़े
स्वामिनारायण रस्ता प्रकरणी कारवाई करा
By admin | Published: February 22, 2017 12:14 AM