आॅनलाइन लोकमतधुळे : शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, त्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षकांची तक्रार निवारण सभा दर तीन महिन्यांनी घेण्यात यावी अशी मागणी शिक्षक भारती संघटनेतर्फे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे यांच्याकडे निवेदनाद्वारे सोमवारी करण्यात आली.जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदाचा डॉ. बोरसे यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, विविध शिक्षक संघटनांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात येऊन निवेदनेही देण्यात येत आहेत.शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही सोमवारी डॉ. बोरसे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देवून त्यावर चर्चा केली.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी दर तीन महिन्यांनी शिक्षकांची तक्रार निवारण सभा आयोजित केली पाहिजे. डी.सी.पी.एस. खात्यात जमा होणाºया रकमांचा हिशोब शिक्षकांना मिळाला पाहिजे. शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या दरवर्षी देणे गरजेचे आहे. २० टक्के अनुदानित शाळा व अनुदानित शाळेतील शिक्षकांना शालार्थ आय.डी. लवकर मिळण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यलयातून पाठपुरावा करणे आवश्यक आहे. शिक्षकांची वैद्यकीय बिले, फरक बिले व थकीत बिले लवकर मंजूर करण्यात यावीत.शिक्षकांना वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण होण्यासाठी पाठपुरावा झाला पाहिजे. अनेक शाळांमधील संच मान्यतेत फरक आहे. विद्यार्थी संख्या असून देखील सन २०१३-१४ पासून आजपर्यंत पदे कमी झालेली आहेत. त्यांचे प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय व संचालक कार्यालय पुणे यांच्याकडे जमा आहेत. संचमान्यता दुरूस्ती करून मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.माध्यमिक विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकाºयांनी ३ मे १९ रोजी मूळ सेवापुस्तकानुसार व सेवापटानुसार सेवा पुस्तकांची दुय्यम प्रत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना उपलब्ध करून देण्यासाठी आदेश दिले होते. जून पेड इन जुलै वेतन देयकासोबत प्रपत्र अ व ब नुसार माितही वेतन पथक कार्यालयात जमा करावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार याविषयी तशा सूचना वेतन पथक कार्यालयास कराव्यात अशीही मागणी करण्यात आली.ज्या अतिरिक्त शिक्षकांच्या मूळ आस्थापनेवर पद रिक्त झाले असेल, त्यारिक्तपदी अतिरिक्त शिक्षकास हजर करून घेण्याबाबत आदेश काढावेत अशीही मागणी करण्यात आली.यावेळी धुळे जिल्हा शिक्षक भारतीचे अशपाक खाटीक, विनोद रोकडे, दिलीप पाटील, शामकांत सोनवणे, राजेंद्र पाटील, किरण मासुळे, रणजित शिंदे, भरत पाटील, दीपक पाटील, कानिफनाथ सूर्यवंशी, संजय पाटील, एन.एन. महाले, आर.एम. चव्हाण, वंदना होलोरे, मिलिंद पाटील, सुधाकर पाटील, खेमचंद पाकळे, गणेश माळी, शाहा इकबाल, अमृत पाटील, हर्षल पवार, मनोजकुमार जाधव, सी.टी.पाटील, मुश्ताक शेख सुलेमान, शैलेश धात्रक, अमिन कुरेशी आदींच्या या निवेदनावर स्वाक्षºया आहेत.
तक्रार निवारण सभा तीन महिन्यांनी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 11:22 AM
शिक्षक भारती संघटनेतर्फे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा, विविध मागण्यांचे दिले निवेदन
ठळक मुद्दे शिक्षकांना शालार्थ आय.डी. लवकर मिळण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यलयातून पाठपुरावा करणेसंचमान्यता दुरूस्ती करून मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यात यावा