धुळे,दि.4- न्यायालयाच्या आदेशाने राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील दारुचे दुकाने बंद केल्यानंतरही मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील बहुतांश ठिकाणी सर्रासपणे दारुची छुप्या पध्दतीने विक्री सुरु आह़े तर शिंदखेडय़ातील तळीरामांनी मात्र हातभट्टीच्या दारुकडे आपला मोर्चा वळविला आह़े धुळ्यालगत मात्र महामार्गावरील हॉटेलात शुकशुकाटच आह़े साक्रीतील जवळपास सर्व दुकाने बंद झाल्याने तळीरामांनी आपला मोर्चा कासारे येथे वळविला आह़े
शिंदखेडा शहरात सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका:यांनी शहरातील 6 बार, 4 बिअर शॉपी, व 3 देशी दारू दुकानांना सील लावून रजिस्टर ताब्यात घेतले आह़े असे असले तरी तळीरामानी आपला मोर्चा हा हातभट्टीकडे वळवला आहे. तालुक्यातील मोठय़ा गावात हातभट्टीची दारू सकाळीच समाप्त होताना दिसत आह़े शिंदखेडा शहरात 13 दारू दुकाने होती़ त्यांना सील लावून तसेच दुकानावरील पाटय़ा झाकल्या आहेत़ गेल्या 3 दिवसापासून दारू मिळत नसल्याने तळीरामांनी ग्रामीण भागातील मोठय़ा गावात जाऊन हातभट्टीची दारू घेण्यास सुरुवात केलेली आह़े हातभट्टीचा धंदा चांगलाच तेजीत आला आह़े तेथूनच शहरातही हातभट्टीची दारू दाखल होण्यास सुरुवात झाली असून वेळीच त्याला आळा घालण्याची गरज निर्माण झाली आह़े
सीमावर्ती भागात चढय़ा दराने विक्री
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्य मार्ग व मालकातर-कोडीद राज्य मार्ग असे तीन महामार्गावरील दारू दुकानांवर कारवाई करण्यात आली़ सदरची दुकानातील दारूचे गोडावून फक्त सील करण्यात आली आहेत़ त्यामुळे तेथे छुप्या पध्दतीने दुप्पटीने दारू विकली जात आह़े परमीट रूम, देशी दारू, बिअर शॉपी ही दुकाने शनिवारपासून बंद झाली़ राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारूची गोडावने सील करण्यापूर्वी प्रत्येक दारू दुकानाचा स्टॉक रजिस्टरच्या नोंदी घेण्यात आल्या़ पण चालाख दारू दुकानदारांनी सील होण्यापूर्वीच विक्री रजिस्टर पूर्ण करून अतिशय कमीसाठा दाखवला़ दारूबंदी झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाला सीमावर्ती भागावर लक्ष ठेवावे लागेल हे आता स्पष्ट आह़े