राजेंद्र शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. या संपूर्ण प्रचारात अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांचीच जास्त चर्चा आहे. या अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांमुळे आघाडी आणि युती धर्म याबाबतची चर्चाही रंगत आहे. कोण - कोणाचा उघड आणि छुपा प्रचार करीत आहे, याचीही चर्चा जोरात आहे. सकाळी विमानतळावर स्वागताच्यावेळेस उपस्थित शिवसेना पदाधिका:यांना उद्धव ठाकरे यांनी भाजपचे उपस्थित नेत्यांसमोर ते मदत करतात का, असा स्पष्ट सवाल करीत आपला रोख स्पष्ट केला होता. त्यानंतर दुपारी प्रचारसभेत सरळ या विषयाला हात घालत त्यांनी व्यासपीठावर बसलेल्या भाजपच्या जिल्ह्यातील व शहरातील प्रमुख नेतेमंडळी व पदाधिका:यांना युती धर्माची आठवण करुन देत, आम्ही जसे धुळे ग्रामीणमध्ये प्रामाणिकपणे मदत करतो, तशी तुम्हीसुद्धा धुळे शहरातील शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करण्याचे सांगितले. तसेच आपण पाठीत खंजीर खुपसणा:यांची औलाद नाही, हे तुम्ही सिद्ध करा, असा टोलाही लगावला. अर्थात त्याचा किती फायदा झाला आणि किती नाही, हे तर निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर धुळे शहरासह जिल्ह्यात अपक्ष उमेदवारांचीच चर्चा सुरु झाली आहे. शहरातील दोन्ही अपक्ष उमेदवारांपैकी कोणाला कोण स्पष्ट तर आतून मदत करतो आहे, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. धुळे शहरातील आघाडीचे घटक पक्षाचे उमेदवार अनिल गोटे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करीत आहेत का, हा सुद्धा चर्चेचा मुद्दा ठरत आहे. कारण उमेदवारी अर्ज दाखल करतांना अनिल गोटे यांनी जेव्हा आपण काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे घटक पक्ष असल्याचे जाहीर केले. तेव्हा त्याठिकाणी आघाडीचे प्रमुख पक्षाचे पदाधिकारी उपस्थित देखील नव्हते. नंतर दोन्ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी स्पष्टपणे यासंदर्भात आम्हाला माहित नसल्याचे देखील सांगितले होते. परंतू नंतर अनिल गोटे यांनी काँग्रेस भवनाला भेट दिली. तेव्हा त्याच पदाधिका:यांनी गोटे यांचा सत्कार केल्याचे फोटो काढले. अर्थात त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ईशार्द जहागिरदार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या पदाधिका:यांना अनिल गोटे यांचा प्रचार करण्याचे सांगितले. तसेच जो करणार नाही, त्याचा अहवाल प्रदेशाकडे पाठविण्यात येऊन त्यांना तातडीने निलंबित करण्यात येईल, असे सांगून पदाधिका:यांना तंबीसुद्धा दिली. पण त्यांच्या पत्रकार परिषदेचा किती फायदा झाला, हे सांगणे आजतरी कठीण वाटते.दुसरीकडे साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार देखील चर्चेत आहेत. याठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी या उमेदवारांसोबत फिरतांना दिसत नाही. सर्वच प्रमुख पदाधिकारी पक्षाने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवारासोबत फिरतांना आणि मते मागतांना दिसत आहे. परंतू ते पक्षाच्या अधिकृत उमेदवारासोबत किती प्रामाणिक राहतील, हे सांगणे पक्षातील पदाधिका:यांना देखील कठीण वाटते. कार्यकर्ते व पदाधिका:यांमधील नाराजी दूर करण्यासाठी भाजपतर्फे प्रय}देखील झाले आहेत. पक्षाचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यात येऊन प्रत्यक्ष बंडखोर उमेदवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करीत ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रय} देखील केला. तसेच पदाधिका:यांना प्रामाणिकपणे युती धर्म पाळण्याचा सल्लाही दिला होता. परंतू त्याचा फारसा परिणाम झाला, हे आजतरी दिसत नाही. कारण बंडखोरी थांबल्याचे दिसत नाही. साक्री आणि शिरपुरात बंडखोरी झालीच. एकूणच जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारात आघाडी आणि युतीचे पदाधिकारी हे अधिकृत उमेदवारासोबत प्रचार करतांना दिसत आहे. परंतू तरीसुद्धा जिल्ह्यात अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांचीच चर्चा जास्त आहे. यांच्यासोबत आतून कोण - कशी मदत करीत आहे आणि त्याचा काय परिणाम होणार, याबाबत राजकीय वतरुळात जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचा प्रभाव हा सर्वच पक्षाच्या सभेत नेतेमंडळी प्रामुख्याने बोलतांना दिसत आहे. एकूणच जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत यंदा अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांचीच चर्चा जास्त होतांना आजतरी दिसत आहे.
Vidhan Sabha 2019: चर्चा अपक्ष आणि बंडखोरांचीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 1:27 PM