धुळे : उपशिक्षकाला न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षक भारतीकडून पाठपुरावा सुरु आहे़ मात्र प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ शिक्षक भारतीच्या पदाधिकाºयांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाजवळ घंटानाद आंदोलन केले़ शिक्षक दिनीच आंदोलन झाल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले होते़ राजेश मोतीराम चौधरी या उपशिक्षकाला मुळ आस्थापनावर हजर करुन घेण्यात टाळाटाळ करणाºया मुख्याध्यापक व संस्थाचालक यांच्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही आपल्या कार्यालयाने केलेली नाही़ वेळोवेळी संघटनेने आपल्या कार्यालयाकडे निवेदन सादर केले़ यासंदर्भात अभ्यास करुन राजेश चौधरी यांना मुळ आस्थापनेवर हजर करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते़ परंतु, आजतागायत या विषयावर अभ्यास करुन निर्णय घेण्यात आलेला नाही़ आंदोलनात शिक्षक राजेश चौधरी, दिपाली चौधरी, अशपाक खाटीक, विनोद रोकडे, कुरेशी, दिलीप पाटील, खेमचंद पाकळे, श्यामकांत सोनवणे, हर्षल पवार, किरण मासुळे सहभागी झाले होते़
‘शिक्षक दिनी’च झाले शिक्षकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 11:58 AM