लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : साक्री तालुक्यात माळमाथ्यावर पश्चिमेकडील आदिवासी क्षेत्रात ब्राह्मणवेल महसूलमंडळात पाणीटंचाई बाबत अनेक गावांचा संयुक्त शासकीय पाहणी दौरा मंगळवारी झाला. योग्य त्या ठिकाणी बोअर अधिग्रहणास त्वरित मंजुरी देण्यात आली.पिंपळनेरचे अपर तहसीलदार विनायक थविल, साक्री पंचायत समिती गट विकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी, पाणी पुरवठा अभियंता, ब्रह्मणवेल मंडळ अधिकारी सोनार, तलाठी, ग्रामसेवक यांनी संयुक्तीक पाणी टंचाई पहाणी आणि विहीर, बोअर अधिग्रहणासाठी प्राप्त प्रस्तावांनुसार संयुक्त पाहणी दौऱ्यात स्थिती अवलोकन करून प्रस्ताव मंजूर करण्यात आले.दौºयात लघडवाड पैकी नवागांव, आमखेल, देवजीपाडा, कालटेक, पचाळे, कोरडे, तोरसखेडे, शिंनबन येथे पिण्याचे पाणी उपलब्ध आहे किंवा नाही ती पाहणी केली.देवजीपाडा येथे मंगळवारी पाहणी होऊन त्वरित भटु आनंदा पाटील यांच्या बोअर अधिग्रहणास मंजुरी देण्यात आली.देवजीपाडा पैकी तोरसपाडा येथे संजय बुधा कोकणी यांचे कडून अधिग्रहणास मंजुरी दिली. कालटेक, पचाळे येथे देखील पाहणी झाली.गट विकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी यांनी कोरोनाची स्थिती असताना सुद्धा आपण सतत पाणी टंचाईचा आढावा घेत असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ते ६ रोजी पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात पाहणी दौरा करीत आहेत.अधिग्रहण प्रस्तावलघडवाळ पैकी नवागांव येथे लवकरच अधिग्रहणाचा निर्णय होणार आहे. आमखेल येथे विकास दामु पाटील यांच्याकडून अधिग्रहण व कोर्ड येथे शांताराम सिताराम पाटील यांचे कडील अधिग्रहण प्रस्ताव आहेत.
टंचाईग्रस्त गावांची पथकाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 9:42 PM