धुळे/शिरपूर : कार्तिक पौर्णिमेनिमित्त धुळ्यात कार्तिक स्वामी यांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. मात्र दुसरीकडे मंगळवारी त्रिपुरारी पौर्णिमा असून कृतिका नक्षत्र नसल्यामुळे शिरपुरातील पाताळेश्वर मंदिर व तापी नदीच्या काठावरील कुरखळी येथील प्राचीन कार्तिक स्वामी मंदिर दर्शनासाठी उघडण्यात आले नाहीत. ही मंदिरे वर्षातून फक्त एकदाच यादिवशी महिलांच्या दर्शनाकरीता उघडण्यात येत होती़धुळ्यात जय्यत तयारीशहरातील चाळीसगाव रस्त्यावरील गीता जिनींग व प्रेसिंग कारखान्याच्या आवारातील श्री कार्तिक स्वामींच्या खासगी मंदीरात व्यवस्थापनाने १२ नोव्हेंबर दिवशी पौर्णिमेनिमित्त भाविकांना दर्शनासाठी तयारी केली होती. यानिमित्त मंत्रोपचारासह धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. याठिकाणी मंगळवारी कार्तिक पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी मोठी रांग लागली होती.मंदिर व्यवस्थापनाने या मंदिरात दरवर्षी भाविकांची प्रचंड गर्दी होत असल्याने आवश्यक त्याठिकाणी प्रखर झोत फेकणारे दिवे, बॅरिकेटस् लावण्यात आले. भाविकांनी यंदाही दर्शनाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याचे भरत अग्रवाल यांनी सांगितले.रात्रीपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी खुले होते. सायंकाळनंतर भाविकांची गर्दी वाढली होती.मोर पिसचे महत्व - मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक मोर पिस घेऊन कार्तिक स्वामींचे दर्शन घेतात. सोबत नेलेले मोर पिस कार्तिक स्वामी यांच्या मूर्तीला लावून ते परत घरी आणून वर्षभर जपून ठेवतात. मंदिराबाहेर मोर पिस विकणाऱ्यांची गर्दी होती. तसेच ते खरेदी करण्यासाठीही भाविकांची गर्दी झालेली होती.शिरपूर - तालुक्यातील कुरखळी व शहरातील पाताळेश्वर मंदिरात कार्तिकी स्वामींचे मंदिर आहे़ हे मंदिर वर्षातून एकदाच कार्तिकी पौर्णिमेला दर्शनासाठी खुले केले जाते़ मात्र यंदा त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे ते दर्शनासाठी खुले करण्यात आले नाही़ तसे पंचागात देखील म्हटले आहे़ त्यामुळे १२ रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हे दोन्हीं मंदिरे बंद ठेवण्यात आली होती़ मात्र काही भाविकांनी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतले़ काही महिलांनी मोर पीस ठेवून प्रतिमेचे पूजन केले़यात्रोत्सव, लोकनाट्य कार्यक्रमतालुक्यातील आमोदे येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्री सारंगेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते़ यात्रेनिमित्त मोठ्यासंख्येने भाविक दर्शनाला आले होते.याठिकाणी तीर्थक्षेत्र निधीतून भक्तनिवास बांधण्यात आले आहे़ दरवर्षी रामगीरबाबा यांच्या स्मरणार्थ यात्रेत भंडाºयाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेत येणाºया भाविकांनी भंडाºयातील महाप्रसादाचा लाभ घेतला.
धुळ्यात मंदिर दर्शनासाठी खुले, मात्र शिरपुरातील बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:18 PM