लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : शहरातील शिवाजी रोडवरील महाकाली माता व पंचमुखी हनुमान मंदिरांवर कारवाई करण्यात येऊ नये, या मागणीसाठी मंदिर बचाव समितीच्या पदाधिकाºयांनी तीन मंत्र्यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली़ मंदिरप्रश्नी स्वत: लक्ष घालून प्रशासनाला योग्य ते आदेश देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले़ शिवाजी रोडवरील मंदिरांवर कारवाई होऊ नये यासाठी मंदिर बचाव समितीच्या पदाधिकाºयांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे व राज्याचे रोहयो व पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली होती़ मंत्रीव्दयींनी मंदिर बचाव समितीच्या पदाधिकाºयांना मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भूमिका मांडण्याचे आश्वासन दिले होते़ त्यानुसार मंगळवारी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वात मंदिर बचाव समितीचे महेश मिस्तरी, हिरामण गवळी, मनोज मोरे, प्रा़ शरद पाटील, अतुल सोनवणे, भिकन वराडे, संजय वाल्हे, राजू महाराज, संदीप सूर्यवंशी, संदीप चव्हाण, प्रदीप जाधव, हेमा हेमाडे, दीपा नाईक, कल्पना गंगवाल, मनीषा ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली़ मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी आपण स्वत: लक्ष घालू व प्रशासनाला योग्य ते आदेश देऊ, असे आश्वासन दिले
धुळयातील मंदिरप्रश्नी गांभिर्याने लक्ष घालणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 8:31 PM
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : तीन मंत्र्यांच्या नेतृत्वात मंदिर बचाव समितीच्या पदाधिकाºयांनी घेतली भेट
ठळक मुद्दे- मंदिरप्रश्नी लक्ष घालण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन- तीन मंत्र्यांची उपस्थिती- विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनाही निवेदन