धुळे : खान्देश महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाणारे खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरादेवी मंदिराला महाराष्ट्र पर्यटन विभागाने अ वर्ग श्रेणी तिर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे़ तर मंदिर विकास कामांसाठी नुकताच एक कोटींचे अनुदान मंजूर केले आहे़खान्देश कुलस्वामिनी आई एकवीरा देवी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा तसेच मंदिर परिसरात विकास कामांसाठी अनुदान मिळावे यासाठी तीन वषार्पासुन ट्रस्टतर्फे सातत्याने पाठपुरावा सुरु होता.नवरात्रोत्सवाचे दिवसात तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे़ तर १ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झालेले आहे. अनुदाचा पहिला हप्ता चाळीस लाख रुपये शासनाने वर्ग केले आहे. निधी मंजूर झाल्याचे पत्र मंदिराचे विश्वस्त गुरव यांना देण्यात आले. निधी मिळाल्याने भाविक व मंदीराच्या विश्वस्त मंडळ आणि कर्मचान्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
मंदिराला ‘अ’ श्रेणीचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:41 PM