लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील पांझरानदी किनारी ट्रॅव्हल्स पॉर्इंटजवळ असलेल्या धार्मिक स्थळ हटविण्यासंदर्भात प्रशासकीय नियोजन केले़ माहिती मिळताच मंदिर परिसरात शिवसेनेने रात्री भजन आंदोलन सुरु केले़ जमाव रविवारी रात्री एकवटला होता़ जेसीबी मशिन फोडल्याने सोमवारी पहाटे तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ मंदिर परिसरात आता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ शहरातील पांझरा नदीकाठच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी साडेपाच किमी रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहे़ त्यामुळे या रस्त्यांना अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हटविण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे़ त्यानुसार सोमवारी पहाटे कालिका माता मंदिर जमिनदोस्त केले जाणार होते पोलीसांनी त्यादृष्टीने नियोजन केले होते़ धार्मिक स्थळावर सुरू असलेल्या कारवाईमुळे आमदार अनिल गोटे व शिवसेनेमध्ये वाद उद्भविला आहे़ त्यामुळे अशा परिस्थितीत कारवाईमुळे तणाव निर्माण होऊ नये, यासाठी मध्यरात्रीच कारवाईला सुरूवात झाली होती़ अशी स्थिती एकीकडे असताना मंदिर परिसरात शिवसेनेच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती़ निर्माण होत असलेला तणाव लक्षात घेता सोमवारी पहाटे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता़ यातून जेसीबी फोडल्यामुळे तणाव अधिकच वाढला़ परिणामी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून सध्या या ठिकाणी तणावपुर्ण शांतता आहे़ अतिक्रमण काढण्यास अद्याप सुरुवात झालेली नाही़
धुळ्यातील ट्रॅव्हल्स पॉर्इंटनजिक धार्मिक स्थळाजवळ तणावपुर्ण शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:56 AM
जेसीबीची तोडफोड : पोलिसांचा बंदोबस्त कायम, मंदिरात भजन सुरु
ठळक मुद्देपांझरा नदी किनारी मंदिर अतिक्रमणाचा वाद पेटलाशिवसेनेचे पदाधिकाºयांनी मांडला मंदिर परिसरात ठाणपोलिसांचा बंदोबस्त कायम, तणावपुर्ण शांतता