लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका निवडणूकीसाठी ‘व्हीव्हीपॅट’चा वापर करणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज़स़ सहारिया यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले़ शिवसेनेने ‘व्हीव्हीपॅट’च्या मागणीसाठी खंडपीठात याचिका दाखल केली असून त्यावर ३ तारखेला कामकाज होणार आहे़ राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज़स़सहारिया हे पत्रकार परिषदेत म्हणाले की, मनपा निवडणूकीत मतदान यंत्रे वापरली जाणार असून ‘व्हीव्हीपॅट’ (व्होटर व्हेरिफायबल पेपर आॅडिट ट्रेल) वापरले जाणार नाही़ प्रभाग क्रमांक ३, ७ व ८ मध्ये प्रत्येकी ३ बॅलेट युनिट वापरले जाणार असून उर्वरीत प्रभागांमध्ये प्रत्येकी २ बॅलेट युनिट वापरले जातील़ शिवाय अ,ब,क,ड या जागांसाठी वेगवेगळया रंगांच्या मतपत्रिका राहणार असल्याने मतदारांना मतदान करणे सोयीचे होईल, असे सहारिया यांनी स्पष्ट केले़ निवडणूक यंत्रणा येत्या आठ दिवसांत अधिक प्रभावीपणे कार्यरत राहणार आहे़ ध्वनीप्रदूषणाचे मॉनिटरींग केले जाईल़ गैरप्रकार रोखण्यासाठी रात्र गस्ती पथके कार्यान्वित राहणार आहेत, अशी माहिती ज़स़सहारिया यांनी दिली़ अधिकारांचा वापर कराधुळे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेस पुरेसे अधिकार देण्यात आले असून त्यांचा परिस्थितीनुसार योग्य वापर करावा, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त ज़स़सहारिया यांनी आढावा बैठकीत दिल्या़ राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज.स.सहारिया शुक्रवारी रात्री अहमदनगर येथून धुळ्यात आले होते. शनिवारी सकाळी अधिकाºयांची आढावा बैठक आणि दुपारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर दुपारी ते नाशिक मार्गे मुंबईला रवाना झाले.व्हीव्हीपॅटसंदर्भात शिवसेना खंडपिठातदरम्यान, शिवसेनेने व्हीव्हीपॅटच्या वापराची मागणी केली होती़ यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला निवेदनही दिले आहे. तसेच यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती, त्यावर ३ डिसेंबर सोमवारी कामकाज होणार आहे़ त्यात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
निवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट’ नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 10:28 PM