लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी सभेनिमित्त मुंबई येथून धुळ्यात विमानाने येणार असल्याने गोंदूर विमान तळावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता़ तपासणी आणि गेट पास नसलेल्यांना विमानतळावर प्रवेश नाकारण्यात आला़ यात माजी मंत्री देखील सुटले नाही़ आतमध्ये केवळ मोजक्याच लोकांना प्रवेश दिला होता़ श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या मैदानावर काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली होती़ त्यानिमित्त राहुल गांधी हे मुंबई येथून स्पेशल विमानाने मोजक्या प्रमुख पदाधिकाºयांसमवेत धुळ्यात दाखल झाले़ तत्पुर्वी विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यातील पुढारी विमानतळावर ठाण मांडून होते़ त्यात माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी मंत्री डॉ़ शोभा बच्छाव, सरचिटणीस ललिता पाटील, आमदार अमरिशभाई पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजितराजे भोसले यांच्यासह अन्य पदाधिकाºयांचा समावेश होता़ विमानतळावर येणाºयांना विशिष्ठ पदाधिकाºयांना गेट पास देण्यात आला होता़ हे पास कोणाला दिले आहेत, त्याची यादी घेऊन पोलीस अधिकारी आणि कर्मचारी विमानतळाच्या गेटवर बंदोबस्तासाठी तैनात होती़ ज्यांच्याकडे पास असेल आणि त्यांचे नाव दिलेल्या यादीत असेल अशांनाच प्रवेश दिला जात असताना त्यांची देखील कसून तपासणी केली जात होती़ माणिकराव गावित विमानतळावर दाखल झाले़ त्यांच्याकडे पास असला तरी तो सभास्थळाचा होता, विमानतळाचा नसल्याने त्यांना गेटजवळच अडविण्यात आले़ त्यांना विमानतळावर जावू दिले जात नव्हते़ शेवटी वाद न घालता ते पुन्हा माघारी फिरले आणि आपल्या वाहनात बसले़ त्याचवेळी पोलीस धावत त्यांच्याकडे आले आणि एक कर्मचारी त्यांच्या वाहनात बसून त्यांना विमानतळावर घेऊन गेला़ त्यानंतर राहुल गांधींचे विमान धावपट्टीवर उतरले़ पुष्पगुच्छ देवून स्वागत केल्यानंतर त्यांना घेऊन वाहनांचा ताफा सभास्थळाकडे रवाना झाला़ अडथळा ठरु नये यासाठी रस्त्यावरील वर्दळ थांबविण्यात आली़
अवघे २८ मिनिटांचे भाषण :-
गोंदूर विमानतळावर ३ वाजून १५ मिनीटांनी धुळ्यात आगमऩ ३ वाजून २० मिनीटांनी सभास्थळाकडे रवाना़ ३ वाजून ३० मिनीटांनी सभास्थळी दाखल़४ वाजून २२ मिनीटांनी नमस्काराने भाषणाला केली सुरुवात़५ वाजता विरोधकांचा समाचार घेत भाषणाचा केला समारोप़ ५ वाजून ५ मिनीटांनी गोंदूर विमानतळाकडे रवाना़ ५ वाजून १५ मिनीटांनी विमानाने मुंबईकडे प्रयाण़