लोकमत न्यूज नेटवर्कधमनार : कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकºयांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. तसेच हंगाम चुकू नये म्हणून नवीन लागवडीला सुरुवातही केली आहे. मात्र, विहिरींची पाण्याची पातळी घटत असल्याचे चित्र दिसत आहे.नवरात्रीच्या कालावधीत उन्हाळी कांद्याला तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळनेर येथे दीड ते दोन हजार रुपयेपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत होता. मात्र, आठवड्यानंतरच कांद्याचा दर दोनशे ते तीनशे रुपयांनी दररोजच घसरू लागल्याने कांदा उत्पादकांमध्ये चिंता पसरली. त्यातच दिवाळीत आठवडाभर कांदा खरेदी बंद होती. जुलै- आॅगस्ट महिन्यात कांद्याला अपेक्षित दर न मिळाल्याने दरवाढीच्या अपेक्षेने शेतकºयांनी चाळीत साठवण केलेला कांदा काढलाच नाही. आॅक्टोबर- नोव्हेंबरमध्येही तीच स्थिती असल्याने व सध्या प्रतिक्विंटल दीडशे ते तीनशे रूपये भाव उन्हाळी कांद्याला मिळत असल्याने आधीच कमी पावसामुळे दुष्काळाचे चटके सहन करणारा शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.साक्री तालुक्यातील धमनार, वसमार, दातर्ती, शेवाळी, बेहेड, कासारे, काटवान परिसरात, चिकसे-जिरापूर शिवारात उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणावर उत्पादित केला जातो. मात्र, पुरेशा दराअभावी आतापर्यंत एकूण कांद्यापैकी ६५ ते ७० टक्केच कांदा येथील शेतकºयांचा विकला गेला आहे. अजूनही साधारणत: दीड हजार टन उन्हाळी कांदा गावातील शेतकºयांकडे शिल्लक आहे. मात्र, कांदा सडण्याच्या समस्येबरोबरच कांद्याचे वजन कमी होणे, कांद्याला अंकूर फुटणे व काजळी चढणे अशा समस्या निर्माण होत आहेत.शेतकºयांची नाराजीकांद्याचा दर न वाढण्यास शेतकरी सरकारच्या कांदा आयात निर्यात धोरणास जबाबदार मानत असून विविध सोशल मिडीयावरून नाराजी व्यक्त करीत आहेत. कांदा उत्पादकांची गळचेपी सरकारने केली असून शेतकरीविरोधी धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी खचला असल्याची भावना शेतकºयांच्या चर्चेतून व्यक्त होत आहे. याचा फटका सरकारला पुढील निवडणुकांत बसेल, असेही भाजीपाला व इतर पिकांच्या दराने निराश झालेला शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे.जलपातळी खालावलीचिकसेत नवीन कांदा लागवडीला सुरूवात झाली आहे. मात्र, विहिरींची जलपातळी खालावली आहे. नविन लागवडीचा हंगाम चूकवू नये म्हणून गेल्या हंगामाचा उन्हाळी कांदा शिल्लक असताना व खरीप पिकही पुरेसे आलेले नसताना येथील शेतकºयांनी कांदा लागवडीचा हंगाम सुरू केला आहे. आठवडागणिक विहिरीतील पाण्याची पातळी खोल जात आहे. म्हणून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करता यावे, यासाठी शेतकरी लागवड क्षेत्रात ठिबकसिंचन करून घेत आहेत. येथील बहुतांश शेतकरी नासिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यासह कळवण, देवळा तालुक्यातूनही नातेवाईकांकडून लागवडीयोग्य तयार रोप उपलब्ध करून लागवड करीत आहेत. नासिक जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्या विहिरी आटल्याने साक्री तालुक्यातील शेतकºयांना रोप विक्री करून किंवा मोफत रोप पुरवठा करीत आहेत.
दराअभावी हजारो टन कांदा पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 10:25 PM