धुळे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आतापर्यंत साडेतीन हजार अवैध नळ कनेक्शन शोधले आहेत़ दंडासह पाणीपट्टीची रक्कम भरून घेऊन संबंधित नळ कनेक्शन वैध करण्यात आले आहेत. मनपाच्या रेकॉर्डवरील पाणीपट्टीधारकांची संख्या ३९ हजार ४१५ झाली आहे़ शहरात ६८ हजार मालमत्ताधारक मनपाच्या रेकॉर्डवर असले तरी नळधारकांची संख्या निम्मेच आहे़ त्यामुळे दरवर्षी अवैध नळधारकांचा शोध मनपाकडून घेतला जातो़ या वर्षात मनपाने साडेतीन हजार नळधारक शोधले आहेत, तर पाणीपट्टीची एकूण मागणी ६ कोटी ४५ लाख होती. त्यापैकी आतापर्यंत ३ कोटी ४७ लाख अर्थात ५० टक्के वसुली झाली आहे़ यापूर्वी मालमत्ता करासोबतच पाणीपट्टी भरली जात होती़ मात्र मागील वर्षापासून मनपाने पाणीपट्टीची आकारणी स्वतंत्रपणे सुरू केली आहे़ मात्र मालमत्ताधारक अधिक असताना नळधारक कमी आहेत़ मनपाला दरवर्षी पाणीपुरवठा करण्यासाठी १० कोटींची तूट सहन करावी लागते़
साडेतीन हजार अवैध नळ कनेक्शन
By admin | Published: February 27, 2017 12:42 AM