धुळे : गुंगीकारक औषधांची वाहतूक करणाऱ्या तिघांना दोन दुचाकीसह शहर पोलिसांच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई रेल्वे स्टेशन परिसरातील खांडल विप्र भवनाजवळ बुधवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास करण्यात आली. त्यांच्याकडून औषधांच्या बाटल्या, दोन दुचाकी असा एकूण ९८ हजार ७०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.
दोन दुचाकीवरून काही तरुण गुंगीकारक औषधांचा बेकायदेशीर साठा घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिस निरीक्षक आनंद काकरे यांना मिळाली. माहिती मिळताच मालेगाव रोडवरून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर खांडल विप्र भवनाजवळ बुधवारी रात्री सापळा लावण्यात आला. दोन दुचाकीवरून तीन जण काहीतरी घेऊन जात असल्याचे लक्षात येताच पथकाने त्यांना थांबविले. त्यांच्याकडील सामानाची चौकशी केली असता त्याच्यात ३०० गुंगीकारक औषधांच्या बाटल्या मिळून आल्या.
पोलिसांनी शाबीर शहा भोलू शहा (वय ४२, रा ऐंशी फुटी रोड, रमजानबाबा नगर धुळे), कलीम शहा सलीम शहा (वय ३४, रा. ऐंशी फुटी रोड, शिवाजी नगर, धुळे) आणि सद्दाम हुसेन फरीद अन्सारी (वय ३१, रा. ताशा गल्ली, गल्ली नंबर ७, सुलतनिया चौक, धुळे) या तिघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिस कर्मचारी मनीष सोनगिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा संशयितांविरोधात भादंवि कलम ३२८, २७६ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक पी. जे. राठोड घटनेचा तपास करीत आहेत.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक आनंद कोकरे व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रशांत राठाेड, शोध पथकातील विजय शिरसाठ, मच्छींद्र पाटील, कुंदन पटाईत, महेश मोरे, मनीष सोनगीरे, प्रवीण पाटील, अविनाश कराड, नीलेश पोतदार, तुषार मोरे, प्रसाद वाघ, शाकीर शेख, गुणवंत पाटील, किरण भदाणे, चालक शाकीर शेख यांनी ही कारवाई केली.