धुळे : मान्सुनपुर्व पावसाने धुळे शहरासह जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी बुधवारी जोरदार हजेरी लावली़ ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडली़ अवधान एमआयडीसीत लोखंडाचे शेड, पत्रे उडाली़ बºयाच ठिकाणी विजेचा पुरवठा खंडीत झाला़ गेल्या तीन दिवसांपासून अवधान एमआयडीसी भागात विजेचा लंपडाव सुरु असल्याने उद्योग क्षेत्राचे जवळपास दीड कोटींचे नुकसान झाले़ तर याच ठिकाणी वीज कंपनीचे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे़ दरम्यान, महसूल विभागाकडून पंचनामा करण्याचे काम सुरु झाले आहे़ वादळी वाळाने मंगळवारी दुपारी अचानक रौद्ररुप धारण केल्यामुळे त्याचा फटका शहरानजिक असलेल्या एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात बसला आहे़ लोखंडाचे मोठ मोठे अँगल असूनही ते अक्षरश: वाकून गेली़ गोदामात लावण्यात आलेले पत्रेही उडाली़ या आवारात असलेली जुनी आणि मोठी अशी वृक्ष उन्मळून पडल्याने सर्वांचीच त्रेधा उडाली़ मंगळवारी दुपारी विजेचा पुरवठा देखील लागलीच खंडीत झाल्याने बत्ती गूल झाली होती़ विजेचे खांब कोसळले, तारा तुटल्याने विज वितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत होता़ अवधान एमआयडीसी भागात नुकसान झालेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे़
महसूलकडून पंचनामे सुरु - अपर तहसीलदारमंगळवारी दुपारी वादळी-वाºयाने आपले रौद्ररुप धारण केल्यानंतर घराचे पत्रे उडाली़ एमआयडीसीत देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर त्याच्या पंचनाम्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे़ धुळे शहरासह गोंदूर, अवधान, रावेरसह अवधान एमआयडीसी येथील नुकसानीचे पंचनाम्यांचे काम तलाठीमार्फत सुरु झाले आहे़ लवकरच अहवाल सादर केला जाईल, असे अपर तहसीलदर संजय शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़५० लाखांचे नुकसान - कार्यकारी अभियंतामंगळवारी वादळ वाºयामुळे वीज खांब वाकले, तारा तुटल्या़ परिणामी वीज पुरवठा खंडीत झाला होता़ बुधवारी सकाळपासून वीज जोडणीचे काम सुरु होते़ त्यासाठी वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचाºयांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केले होते़ अग्रवाल नगर आणि एमआयडीसीचा भाग सोडल्यास गुरुवारी दुपारपर्यंत शहरातील ९० टक्के भागात वीज पुरवठा सुरळीत झाला होता़ गुरुवारी सायंकाळपर्यंत उर्वरीत ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत होईल, असा दावा वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता किशोर शिंदे यांनी केला आहे़