लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) ८ जागांसाठी सकाळी आठ ते ११ या तीन तासात ३३ टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. सन २०११ च्या वाढीव लोकसंख्येनुसार डीपीडीसीच्या वाढीव ८ तर दोंडाईचा नगरपालिकेतील एका सदस्याची रिक्त असलेली १ अशा एकूण ९ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार होती. परंतु, मोठ्या नागरी गटातील एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे उर्वरीत ८ जागांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन केंद्रावर सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. १४६ पैकी ४९ मतदारांनी बजावला हक्क डीपीडीच्या ग्रामीण, लहान नागरी व नगरपंचायत मतदार संघातील १४६ मतदार त्यांच्या निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत. पैकी सकाळी अकरा वाजेपर्यंत ४९ मतदारांनी मतदान केले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे.
तीन तासात ३३ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 11:30 AM
डीपीडीसी निवडणूक : ८ जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात
ठळक मुद्देसकाळी ११ वाजेपर्यंत ग्रामीण मतदार संघातील ५६ मतदारांपैकी ४० मतदारांनी मतदान केले. लहान नागरी मतदार संघातील ५६ मतदारांपैकी केवळ ३ मतदारांनी मतदान केले. उर्वरीत नगरपंचायत मतदार संघाच्या ३४ मतदारांपैकी केवळ ६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.