धुळे : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांसह तीनजण जखमी झाल्याची घटना २९ रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास मेहेरगाव ते बोरीस दरम्यानच्या रस्त्यावरील जंगलात घडली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.मेहेरगाव ते बोरीस गावाकडे जाणाºया रस्त्यावर जंगल परिसरात बिबट्याने दोन शेतकरी व एका मेंढपाळावर हल्ला केला.बिबट्याने अनिल दिलीप अहिरे (२८) याच्या डाव्या मांडीला चावा घेतला, तर मधुकर झुलाल पाटील (६५) यांच्या तोंडावर व डाव्या हातास चावा घेतला. संदीप सुभाष भामरे (३२) यांच्या उजव्या हाताला व दंडास बिबट्याने चावा घेतला. हे तिघेही मेहेरगाव येथील रहिवासी आहेत.या जखमींना कुणाल देवरे, अमोल राउत, गावकरी शेखर भामरे, प्रफुल भामरे, अनिल भामरे, रुग्ण सेवक गोकुळ राजपूत यांनी मदत केली. त्यांना भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मेहेरगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांनी केलेली आहे.
बिबट्याच्या हल्यात तीनजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:54 AM