शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

धुळ्यात तुंबळ हाणामारीत तिघे दुखापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 10:49 PM

संताजी चौक : तलवार, लोखंडी रॉडचा वापर, परस्पर विरोधी फिर्याद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पूर्ववैमनस्यातून धुळ्यातील संताजी चौकात दोन गटात झालेल्या हाणामारीत तीन जणांना गंभीर दुखापत झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली़ याप्रकरणी शनिवारी रात्री ९ जणांविरुध्द आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ दरम्यान, दुसºया गटानेही रविवारी फिर्याद नोंदविली असून त्यात १० जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़  आकाश गुजर आणि सिध्दार्थ खैरनार यांच्यात झालेल्या भांडणाच्या कारणावरुन शहरातील किसन बत्तीवाला खुंट तसेच गल्ली नंबर सहाच्या कॉर्नरलगत संताजी चौकात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दोन गट समोरासमोर आले़ त्यांच्यात सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली़ त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने परिसरात तणावचे वातावरण निर्माण झाले होते़ या हाणामारीत सर्रासपणे तलवार, चॉपर आणि लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला़ या हाणामारीत मंगल गिरधर गुजर, आकाश विनोद बडगुजर, रोहिदास तापीराम वानखेडे या तिघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले़ त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी मंगल गिरधर गुजर (रा़ गल्ली नंबर ५, घड्याळवाली मशीदजवळ, धुळे) यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास फिर्याद दिली़ त्यानुसार विक्की परदेशी, किरण अहिरे, करण परदेशी, संतोष परदेशी, अर्जुन परदेशी, सिध्दार्थ खैरनार, आकाश साखरे, शुभम तांबट, गणेश वाघारे (कोणाचेही पूर्ण नाव माहिती नाही) (सर्व रा़ धुळे) यांच्या विरोधात भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२५, ५०४, ५०६ सह आर्म अ‍ॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़ दुसºया गटातर्फे फिर्यादसंताजी चौक परिसरात झालेल्या हाणामारीप्रकरणी दुसºया गटातर्फे फिर्याद देण्यात आली़ पूर्ववैमनस्यातून लाकडी दांड्याने मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे़ याप्रकरणी सिध्दार्थ खैरनार याने फिर्याद दिली़ त्यानुसार धर्मदास गुजर, प्रमेय मोरे, सचिन कर्णे, प्रशांत कर्णे, आकाश बडगुजर यांच्यासह १० जणांविरुध्द आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी