लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथे शेतात राखणदार म्हणून काम करणाºया विधवा महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी चार आरोपी निष्पन्न झाले असून तिघा नराधमांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. विधवा महिलेवर अत्याचाराची ही घटना १५ जून रोजी मध्यरात्रीनंतर घडली होती. ही महिला शेतात झोपडीबाहेर खाटेवर झोपली असताना तिला चार अनोळखी व्यक्तींनी उचलून शेतात नेले व तेथे तिच्यावर सामूहिकरीत्या अत्याचार केले होते. त्या महिलेच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलिसांत सामूहिक अत्याचाराच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. तक्रारदार महिलेने सांगितलेल्या वर्णनानुसार पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तपास अधिकारी संदीप गावीत, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी तपासासाठी पथके तयार केली. पथकांनी परिसर पिंजला या पथकांनी शिरपूर तालुक्यातील टेकवाडेसह अर्थे, विखरण, वाघाडी, भरवाडे, टेंभे, तºहाडी, खामखेडा व परिसरातील गावे, ढाबे, हॉटेल यांची तपासणी केली. तसेच शेतांमध्ये व ट्रॅक्टरवर काम करणारे मजूर, पेट्रोलपंप, हॉटेल, पानटपºया अशा ठिकठिकाणी जाऊन वर्णनानुसार शोध घेतला. संशयित गवसला; गुन्ह्याची कबुलीरेकॉर्डवरील संशयितांची तसेच दारूचे व्यसन, गुटखा खाणाºया व्यक्तींची पडताळणी केली असता राजेश बदु भिल (३५) हा संशयित मिळाला. त्यास विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन गोरख भाईदास भिल (३३), शरद गंगाराम भिल (३२) व रवींद्र उर्फ बांगा रामचंद्र भिल सर्व रा.भरवाडे, ता.शिरपूर या साथीदारांची नावे सांगितली. यातील रवींद्र भिल हा फरार असून उर्वरीत तिघांना अटक करण्यात आली आहे. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप सावंत, पोलीस निरीक्षक बुधवंत उपस्थित होते.