महापालिकेसाठी २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत शहरातील एकूण प्रभाग १९ करण्यात झाले होते. त्यात प्रत्येक प्रभागात चार सदस्य निवडून आले होते. दरम्यान, पुढील निवडणुकीत प्रत्येक प्रभागातून आता ३ सदस्य निवडणूक लढवू शकणार आहेत. २०१९ मध्ये निवडणूक झाल्यानंतर आगामी २०२३ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत एक सदस्यीय प्रभाग रचना राहील, अशी शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागाचा विचार करून, तेवढ्या भागातच विकासकामे करण्यावर भर दिला होता. मात्र, आता पुन्हा बहुसदस्यीय प्रभागरचना कायम राहणार असल्याने नगरसेवकांना आपल्या उर्वरित कार्यकाळात संपूर्ण प्रभागाच्या विकासावर भर द्यावा लागणार आहे.
मनपाची सध्याची स्थिती
पाच वर्षांपूर्वी हद्दवादीत अकरा गावांचा समावेश झाल्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत एकूण १९ वॉर्ड झालेत. सुरुवातीला एका प्रभागात दोन सदस्य निवडले जात होते. त्यानंतर सदस्यीय पद्धत झाल्याने १९ प्रभागांतून ७५ सदस्य निवडून आले आहेत.
शहरात १९ ऐवजी होणार २५ प्रभाग
शहरात त्रिसदस्य पद्धत आहेत. एका प्रभागात तीन सदस्य असे एकूण ७५ नगरसेवकांसाठी एकूण १९ प्रभाग तयार करण्यात आले होते. मात्र, आता एका प्रभागात २ सदस्य असल्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत एकूण २५ प्रभाग होण्याची शक्यता आहे.
युती-आघाडी करताना येणार टेन्शन
बहुसदस्यीय प्रभागपद्धत असल्याने राजकीय पक्षांनी युती आघाडी केली तर थेट एक प्रभाग एका पक्षासाठी सोडावा लागणार आहे. एका प्रभागात युतीतील पक्षातील वेगवेगळे उमेदवार दिल्यास राजकीय पक्षांचे गणितदेखील बिघडण्याची शक्यता आहे. कारण एका प्रभागात नागरिकांना तीन उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे.