लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : केद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात चारशे कोटींची तरतुद र्स्टाटअप उपक्रमासाठी केली आहे़ यामाध्यमातुन बेरोजगारीचा प्रश्न कायम स्वरूपी सुटून शहराच्या विकासात भर पडणार आहे असे प्रतिपादन खासदार डॉ़सुभाष भामरे यांनी केले़ शहरातील आयएमआय हॉल येथे रविवारी स्टार्टअपच्या दुसºया मोबाईल अॅपचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी हर्षल विभांडिक, डॉ़ रवी वानखेडकर, सर्जन डॉ़ दिलीप पाटील, अरूण सांळूखे दर्शन सुर्यवंशी आदी उपस्थित होते़ स्टार्ट-अप उपक्रमातुन माध्यमातुन १५ आॅगस्टपर्यत जिल्हात सहा स्टार्टअप सुरू होत आहेत़ या माध्यमातुन युवकांना नोकरीसाठी पुणे, नाशिक, मुंबई शहरात स्थलांतर करण्याची गरज राहणार नाही़ स्टार्टअप उपक्रमाच्या माध्यमातुन धुळ्यात राज्यभरातील विविध कंपन्याचा विस्तार वाढून शहराच्या विकासात भर पडणार असल्याचे हर्षल विभांडिक यांनी सांगितले़ कार्यक्रमाचे आभार डॉ़ साळुखे यांनी मानले़*तरूणांसाठी स्टार्ट अप आशेचे किरण*जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाली आहे़ केंद्र व राज्य सरकार मार्फेत शहरात स्टॉटअप उपक्रम सुरू करण्यात आला आहे़ यामाध्यमातुन शहरात औद्योगिक विकास होऊन तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे़ भविष्यात स्टार्ट अपचा उपक्रम बेरोजगार तरूणांना आशेचा किरण देणारा असे प्रतिपादन डॉ़राजकुमार सुर्यवंशी यांनी केले़
स्टार्टअपच्या माध्यमातून विकासात भर पडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:31 AM