लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गुरुवारी आणखी १५१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच आठ रुग्णांचा मृत्यू झाला.धुळे शहरातील जे बी रोड परिसर, चितोड रोड व भोई सोसायटी येथील रुग्णांचा मृत्यू झाला. तालुक्यातील बोरिस, शिरपूर तालुक्यातील जुनापानी, शिरपूर शहरातील एक व पिंपळनेर येथील दोघांचा हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.गुरुवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ९९रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील नऊ, शिरपूर तालुक्यातील २७, साक्री तालुक्यातील चार व शिंदखेडा तालुक्यातील १२ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ६ हजार ३५५ इतकी झाली आहे.
गुरूवारी १५१ अहवाल पॉझिटिव्ह, आठ रूग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 9:44 PM