लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील आणखी १५२ अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आले. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला.मृतांमध्ये, धुळे शहरातील दोन, शिंदखेडा, दोंडाईचा व साक्री तालुक्यातील निजामपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.गुरुवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ६७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील २३, शिंदखेडा तालुक्यातील ४३, शिरपूर तालुक्यातील १४ व साक्री तालुक्यातील पाच रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ७ हजार ८२२ इतकी झाली आहे.
गुरूवारी १५२ अहवाल पॉझिटिव्ह, पाच रूग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 9:14 PM