‘मार्चएन्ड’ची लगबग : बिलाचा ओघ सुरूच;रात्री 11 र्पयत स्वीकृती
धुळे, दि.31- मार्चअखेरमुळे जिल्हा कोषागार कार्यालयात दोन दिवसांत मंजुरीसाठी 750 बिले जमा झाली आहेत. त्यापैकी 450 बिले गुरुवारी तर 300 बिले शुक्रवारी दुपारी 3 वाजेर्पयत जमा करण्यात आली. अखेरच्या दिवशी रात्री 11 वाजेर्पयत बिले स्वीकारण्यात येणार असल्याने बिलांची संख्या वाढणार आहे, अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी बी.डी. पाटील यांनी दिली.
572 बिलांना मंजुरी
गुरुवारी प्राप्त 450 व आधीची अशी मिळून तब्बल 572 बिलांची पडताळणी करून त्यांना मंजुरी देण्यात आली. या सर्व बिलांची मिळून रक्कम 102 कोटी 38 लाख रुपये एवढी आहे, असे पाटील यांनी सांगितले. शुक्रवारी रात्री 11 वाजेर्पयत बिले स्वीकारण्यात येणार आहेत. 4 वाजेर्पयत बिलांची संख्या 300 वर पोहचली होती. त्यांची संख्या रात्रीर्पयत 500 वर जाईल, अशी शक्यता व्यक्त होत असून त्या सर्वाची रक्कम सुमारे 100 कोटीवर जाईल, असेही जिल्हा कोषागार अधिकारी पाटील यांनी सांगितले.
‘जलयुक्त’च्या बिलांचा भरणा!
मार्चअखेरच्या शेवटच्या दोन दिवसांत जिल्हा कोषागार कार्यालयास प्राप्त बिलांमध्ये सर्वाधिक बिलांची संख्या जलयुक्त शिवार अभियान या योजनेच्या कामांशी व विभागांशी संबंधित आहेत. त्यात कृषी, आदिवासी विकास, जलसंधारण, जि.प. तसेच समाज कल्याण खात्याचा समावेश आहे.