धुळे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला जागोजागी लागलेल्या गळत्यामुळे दररोज हजारो लीटर पाणी अक्षरश: वाया जात आहे़ त्यामुळे शहरातील बहुतांश भागांना नियोजन नसल्याने आठ दिवसाआड पाणी होत आहे. तर दुसरीकडे हजारो लीटर स्वच्छ पाणी वाहून वाया जात आहे.‘दुसºया सांगे ब्रह्मज्ञान...डेंग्यूचे डास निर्माण होतील म्हणून मनपा नागरिकांना आठवड्यातून एकदा पाण्याचे साठे उपसण्यास सांगते, भांडे घासून स्वच्छ करण्यास सांगते. मात्र शहरात अनेक ठिकाणी गळतीमुळे वाया जाणाºया पाण्यात डासांची निर्मिती होत असल्याने साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे. यामुळे महापालिकेची स्थिती ‘दुसºया सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण’ अशी झाली आहे.पावसाळ्यात देखील जलसंकटजिल्ह्यात सर्वत्र समाधान कारक पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पुर आला आहे़ तर गेल्या महिन्याभरापासून पांझरा नदी देखील दुथडी वाहत आहे. असे असतांनाही केवळ पाणीपुरवठ्याच्या नियोजनाअभावी नागरिकांना कृत्रिम जलसंकटाला सामोेरे जावे लागत आहे़ पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती देखील करावी लागत आहे़नियोजनाबाबत वेळापत्रक नाहीशहराला पाणीपुरवठा करणारे नकाणे, डेडरगाव तलाव ओव्हर फ्लो झाले आहे. पांझरा नदी दुथडी भरुन वाहत आहे. एवढ्या मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतांना शहरात काही भागात ४ ते ५ दिवसाआड तर कुठे आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे़ ते पाणीसुद्धा कोणत्या दिवशी किती वाजता येईल, याचे वेळापत्रक नाही. पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पाणी पुरवठ्याच्या वेळा पत्रकाचे नियोजन आणि गळती थांबविण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पण याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देतांना दिसत नाही.दुषित पाणी पुरवठाअनेक ठिकाणी व्हॉल्व तसेच जलवाहिन्या फुटल्या आहेत़ त्यामुळे काही भागागत दुषित पाणीपुरवठा होत आहे. महापालिका प्रशासनाकडून याकडे लक्ष देण्याची गरज आहे़
गळत्यामुळे धुळेकरांवर कृत्रिम जलसंकटाची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 10:18 PM