ऑनलाईन लोकमत
साक्री,दि.24 : शहरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील कॉलनी परिसरात प्रती 500 रुपये टॅँकर प्रमाणे पाण्याची विक्री होत आहे. नगरपंचायत प्रशासनाला गांभीर्य नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
पाणी विकत घेण्याची ज्यांची क्षमता आहे. ते पाणी विकत घेतात. परंतु, जे गोरगरीब आहेत. त्यांचे मात्र, हाल होत आहे. दिवसभर मजुरी करायची आणि रात्री पाण्यासाठी भटकंती करण्याचे प्रकार शहरात सुरू आहे. भर पाण्याच्या शोधात रहायचे. उपलब्ध पाण्याचे योग्य ते नियोजन केल्यास तीन ते चार दिवसाआड पाणी मिळू शकणार आहे. परंतु, तसे न होता. पाणी सोडणारे कर्मचारी त्यांच्या मनमानी पद्धतीने पाणी सोडत असल्याचा आरोप होत आहे.