आॅनलाइन लोकमतधुळे : महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सरसकट १० टक्के हंगामी तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय पंधरा दिवसांपूर्वीच घेतला होता. त्यानुसार आज मध्यरात्रीपासून (३१ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून) ही भाडेवाढ लागू होणार आहे. ऐन दिवाळीच्या सणात लांब पल्याच्या ठिंकाणी प्रवास करणाºया प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. एस.टी. महामंडळाच्या सुत्रानुसार गर्दीच्या हंगामातील ही दरवाढ २० दिवसांसाठी लागू होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून डिझेलच्या दरात होत असलेली वाढ, चेचीस, टायर, व महागाई भत्याच्या मुल्यात वाढ झाल्याने, एस.टी. महामंडळाने सुधारित भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार १६ जून १८च्या मध्यरात्रीपासून पाचच्या पटीने भाडेवाढ लागू करण्यात आली. या भाडेवाढीला तीन महिने उलटत नाही तोच महामंडळाने दिवाळीच्या कालावधीसाठी हंगामी भाडेवाढ लागू केलेली आहे. लांब पल्याच्या ठिकाणी जाणाºयांना फटका धुळ्याहून औरंगाबाद, नाशिक, शिर्डीसाठी साध्या बससाठी २० रूपये, रात्रसेवेसाठी २५ रूपये तर शिवशाहीसाठी ३० रूपये जादा मोजावे लागणार आहेत. पुण्यासाठी साधी बसने संगमनेर मार्गे ४५ तर नगरमार्गे ४० रूपये, तर शिवशाहीसाठी ६५ रूपये जादा मोजावे लागणार आहेत. मुंबईसाठीही साधी बसने ४०, रात्री सेवेसाठी ५५ व शिवशाहीने ६५ रूपये जादा मोजावे लागणार आहेत.
आज मध्यरात्रीपासून एस.टी.ची भाडेवाढ लागू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:37 AM
सणांमध्ये प्रवाशांना आर्थिक फटका : २० नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ राहणार
ठळक मुद्देहंगामी भाडेवाढीमुळे प्रवाशांना फटका२० नोव्हेंबरपर्यंत राहणार भाडेवाढतीन महिन्यात दुसºयांचा भाडेवाढ