धुळे : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असून धुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत धुळे जिल्ह्यातील ३९ हजार ३४५ शेतकऱ्यांना ७२ कोटी ६ लाख रुपये एवढी पीक विमा रक्कम कापूस पिकासाठी मंजूर झाली आहे. तसेच खरीप हंगाम २०१९ मध्ये एकूण ९७ कोटी एक लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे. पीक विमा योजनेंतर्गत शेतकºयांना आर्थिक लाभ झाला आहे़बँक, जनसुविधा केंद्र, आपले सरकार केंद्र या ठिकाणी प्रधानमंत्री पीक विम्याची रक्कम शेतकºयांकडून स्वीकारण्यात येत आहे. पीक विमा भरण्यासाठी अंतिम दोन दिवस शिल्लक असल्याने बँकेत अथवा जनसुविधा केंद्रात शेतकºयांची गर्दी होवू नये व शेतकºयांची गैरसोय होवू नये म्हणून जनसुविधा केंद्रांनी जास्तीत जास्त शेतकºयांना सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाºयांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.
पिक विम्यासाठी उद्या शेवटची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 10:03 PM