शहरात नागरिकांना सुटीचा दिवस आनंदात घालवता यावा यासाठी कोणतेही ठिकाण नाही. शहरात विविध भागात असलेल्या उद्यानांची परिस्थिती खराब आहे. मध्यवर्ती भागात असलेल्या टॉवर उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी असलेला कारंजा बंद आहे. खेळणी मोडकळीस आली आहे. त्यामुळे उद्यानाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. या कामासाठी पाच कोटी रुपये मंजूर केले होते. त्यानुसार कामाला सुरुवात झाली. उद्यानात मेडिटेशन सेंटर, ॲम्पी थिएटर, ध्वजस्तंभ, हिरवळ, कारंजा, फुलझाडे लावणे आदी कामे होणार आहे. त्यानुसार १ कोटी ७० लाखांचे काम पूर्ण झाले. त्यानंतर निधी मिळाला नसल्याने दोन वर्षांपासून उद्यानाचे काम थांबले आहे. या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, शहरात अमृत योजनेतून साकारण्यात आलेल्या उद्यानांचीही दुरवस्था झाली आहे. अमृत योजनेतून विविध भागात उद्यान तयार करण्यात आले आहे. या उद्यानांच्या कामांवर खर्च झालेला निधी पाण्यात गेला असल्याचे चित्र आहे.
टॉवर उद्यान निधी अभावी दाेन वर्षापासून रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:26 AM