- आबा सोनवणे
लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या व साक्री शहरातील प्रभाग क्रमांक तीनमध्ये नागरे नगर येथील खुल्या जागेत उभारलेल्या खेळणी व व्यायाम साहित्याचे शनिवारी शिवसेनेचे तालुका प्रमुख विशाल देसले यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साक्री नगर पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र टाटिया, भाजपा तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, नगरसेविका अलका बिरारीस, संगीता रामोळे,जि प सदस्य विजय ठाकरे, पं. स. सदस्य रमेश सरक, अॅड.नरेंद्र मराठे, बापू गीते, प्रेस क्लबचे अध्यक्ष आबा सोनवणे, जी.टी मोहिते, महेंद्र चंदेल, भाजपा शहराध्यक्ष महेंद्र देसले, साक्री तालुका विधायक समितीचे अध्यक्ष सुजन सोनवणे, पेरेजपूरचे उपसरपंच मनोज देसले, पाटील परिवारातील सदस्य आदी उपस्थित होते. प्रास्तविक प्रभागाच्या नगरसेविका अॅड.पूनम शिंदे- काकुस्ते यांनी केले. त्यांनी हा ओपन स्पेस स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान देणाºया निनाद शेवाळे आणि सुभाष ठाकरे या दाम्पत्यांचा स्वच्छतादूत म्हणून विशेष सत्कार केला.श्री देसले म्हणाले की, सदर साहित्याच्या उभारणीसाठी गेल्या दोन ते अडीच वर्ष सतत पाठपुरावा करून प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी साहित्य उभे करून घेणा?्या अँड. काकुस्ते यांचे खरोखरच कौतुक आहे . सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री ना. दादा भुसे यांनी सदर कामी सहकार्य केले. साक्ररीची वाटचाल ही शहराच्या दिशेने होत आहे, अशात शहरातील मोकळ्या भूखंडांवर विरंगुळ्याची साधने उपलब्ध होणे ही गरज बनू पाहत आहे याची सुरुवात प्रभाग तीनमधून होत असून ही बाब निश्चितच दिलासादायक आहे. पेरेजपूरचे उपसरपंच देसले म्हणाले की, राजकारणात महिलांसाठी आरक्षण आहे परंतु महिलांच्या नावे त्यांच्या कुटुंबातील पुरुष सदस्य नेतृत्व करतात. मात्र ही बाब अॅड.काकुस्ते यांनी खोडून काढत महिलांसाठी दिशादर्शक असे काम हाती घेतले. इतर महिलांनाही त्यामुळे प्रेरणा मिळत आहे. याप्रसंगी नरेंद्र मराठे, संजय अहिरराव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. उद्घाटन कार्यक्रमासाठी नागरे नगरसह प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण तोरवणे यांनी केले तर आभार अनिल आहिरे यांनी मानले.जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या साहित्याचा प्रभागातील बालके व महिलांसाठी लाभदायक ठरतील, असे सेनेचे तालुका प्रमुख विशाल देसले यांनी यावेळी बोलताना सांगितले.