शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

Vidhan Sabha 2019 : भाजपची लेखाजोखा मांडण्याची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 9:51 PM

उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता संमेलन : भुपेंद्र यादव यांचे प्रतिपादन

ठळक मुद्देअनेकांचा पक्ष प्रवेशनड्डा ऐवजी आले यादवगुणवत्तेनुसार उमेदवारी मिळणाऱ़़ मंंत्री गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण४२ आमदार आम्ही विजयी करुन दाखवू असे आश्वासन

धुळे : भाजपची स्वतंत्रपणे काम करण्याची पध्दत आहे़ सत्तेच्या काळात काय काम केले, कोणते निर्णय घेतले याचा लेखाजोखा मांडण्याची परंपरा असून ती आजही कायम आहे़ यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली़ त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे़ त्यामुळे आगामी काळात फडणवीस सरकार विराजमान होईल असा विश्वास महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला़ दरम्यान, त्यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश नोंदविला़होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचा उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता संकल्प संमेलन धुळ्यात पार पडले़ त्यावेळी यादव मार्गदर्शन करताना बोलत होते़ व्यासपिठावर राज्याचे संघटनमंत्री विजय पुराणिक, खासदार डॉ़ सुभाष भामरे,  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार एकनाथ खडसे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, माजी मंत्री डॉ़ विजयकुमार गावित, खासदार डॉ़ हिना गावित, खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार स्मिता वाघ, अ‍ॅड़ किशोर काळकर, अनुप अग्रवाल, बबन चौधरी, उदेसिंग पाडवी, विजय चौधरी, आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पटेल, सिमा भोळे, उज्वला पाटील, आमदार देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, खासदार भारती पवार, अशोक कांडेलकर, ओमप्रकाश खंडेलवाल, शितल नवले, सोनल शिंदे, जयश्री अहिरराव, शशी मोगलाईकर, विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते़भूपेंद्र यादव पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कलम ३७० रद्द करुन खूप मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे़ भ्रष्टाचाराच्या विरोधात पक्ष काम करीत आहेत़ देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढून पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. काम करणाऱ्यांना पक्षात संधी दिली जाते़विजय पुराणिक यांनी भाजप पक्ष आणि आजवर केलेली कामांची माहिती घरोघरी द्या़मंत्री रावल म्हणाले, पुर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून धुळ्याकडे बघितले जात होते़ आता धुळेच नाहीतर संपूर्ण खान्देश भाजपचा बालेकिल्ला झाला आहे़ कार्यकर्त्यांनी गाफिल राहू नये असेही सांगितले. शेवटी आभार अनुप अग्रवाल यांनी मानले़जनसंवाद - दुपारी राम पॅलेस येथे झालेल्या संवाद कार्यक्रमात ३७० कलम रद्द केल्याने, जम्मु-काश्मिरही विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल. असा विश्वास भाजपचे महाराष्टÑाचे प्रभारी अ‍ॅड. भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केला.यावेळी शहरातील व्यापारी, डॉक्टर, वकील, शैक्षणिक संस्थाचालक आदी उपस्थित होते.अनेकांचा पक्ष प्रवेशउत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्याचे औचित्यसाधून अनेकांनी भाजप पक्षात आपला पक्षप्रवेश नोंदविला़ त्यात धुळ्यातून माजी आमदार अनिल गोटे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अमोल सूर्यवंशी आणि माजी नगरसेविका वंदना सूर्यवंशी, प्रदीप पानपाटील यांनी प्रवेश घेतला.कार्यक्रमास यांची होती उपस्थितीव्यासपिठावर राज्याचे संघटनमंत्री विजय पुराणिक, जलसंपदा मंत्री एकनाथ खडसे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, प्रदेश उपाध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ़ सुभाष भामरे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, खासदार डॉ़ हिना गावित, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, खासदार भारती पवार, माजी मंत्री आमदार डॉ़ विजयकुमार गावित, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार स्मिता वाघ, आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पटेल, आमदार देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला पाटील, महापौर सीमा भोळे (जळगाव), महापौर चंद्रकांत सोनार, माजी आमदार उदेसिंग पाडवी, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी (धुळे ग्रामीण), विजय चौधरी (नंदुरबार), डॉ.संजू पाटील (जळगाव) अनूप अग्रवाल (धुळे महानगर जिल्हाध्यक्ष), अ‍ॅड.किशोर काळकर (विभागीय संघटन सचिव), धुळ्याच्या उपमहापौर कल्याणी अंपळकर, धुळे महापालिका स्थायी समिती सभापती युवराज पाटील, नगरसेवक शितल नवले, नगरसेवक सोनल शिंदे, माजी महापौर जयश्री अहिरराव, विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी उपस्थित होते़गुणवत्तेनुसार उमेदवारी मिळणाऱ़़ मंंत्री गिरीश महाजनांचे स्पष्टीकरणमेळाव्यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना विविध बाबींचा परामर्श घेतला़ पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथे येऊन गेले, त्यावेळेस उत्तर महाराष्ट्रातून ४७ आमदारांपैकी किमान ४२ आमदार आम्ही विजयी करुन दाखवू असे आश्वासन दिले आहे़ हे आश्वासन बुथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर दिले आहे़ त्यामुळे कार्यकर्त्यांनी मनापासून कामाला लागले पाहीजे़ ते म्हणाले आपल्या पक्षात अनेकांनी प्रवेश केला आहे़ त्यामुळे त्यांना संधी दिली जाईल, निष्ठावंतांचे काय होईल, असे अनेक प्रश्न सध्या कार्यकर्त्यांच्या मनात आहेत़ परंतु उमेदवारी देताना किंवा कोणतेही पद देताना त्यांची गुणवत्ता आणि काम तपासूनच संधी दिली जाईल़ तसेच हे करत असताना निष्ठावान कार्यकर्त्यांना प्रथम संधी असेल हे विसरु नका़ आपापसातील काही गट बाजी असेल ती दूर ठेवा असा सल्लाही महाजन यांनी मनोगतातून कार्यकर्त्यांना दिला़नड्डा ऐवजी आले यादवभाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे़ पी़ नड्डा हे उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यासाठी येणार होते़ त्यादृष्टीने नियोजन देखील करण्यात आले होते़ परंतु दिल्ली येथे तातडीची बैठक असल्यामुळे नड्डा पुण्याहून परस्पर दिल्लीकडे रवाना झाले़ मेळाव्याचे नियोजन ठरलेले असल्यामुळे भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांना ऐनवेळी निमंत्रित करण्यात आले़ ते मुंबईतच असल्यामुळे त्यांनी लागलीच होकारही दिला़

टॅग्स :Dhuleधुळे