आॅनलाइन लोकमतधुळे :जिल्हा परिषदेत वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरू होते.आतापर्यंत नऊ विभागातील ७५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या असून, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांच्या बदल्या लांबणीवर पडलेल्या आहेत.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन घेऊन मे आणि जुन महिन्यात होणाºया प्रशासकीय बदल्यांची प्रक्रीया जुलै महिन्यात राबविण्यास अनुमती देण्यात आली.जिल्हा परिषदेत २२ जुलै पासुन बदल्यांसाठी समुपदेशन सुरु होते. आतापर्यंत लघुसिंचन, ग्रामपंचायत, बांधकाम,ग्रामीण पाणी पुरवठा, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, कृषी, अर्थ विभाग, शिक्षण विभाग या विभागातील प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया पार पडली. या नऊ विभागातील ७५ कर्मचाºयांच्या बदल्या आतापर्यंत झालेल्या आहेत. तर आरोग्य विभागातील बदल्यांसाठी २५ जुलै रोजी समुपदेशन निश्चित केले होते.जिल्हा परिषदेतील सर्वात मोठे केडर असलेल्या आरोग्य विभागातील बदल्यांसाठी समुपदेशनाची प्रक्रीया मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी तात्पुरती पुढे ढकलली आहे. १० आॅगस्ट पर्यंत कर्मचाºयांच्या प्रशासकीय बदल्या करता येणर आहेत.कोरोनाच्या कालावधीत आरोग्य केंद्र वउपकेंद्रात कार्यरत असलेले आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक स्त्री व पुरुष,औषध निर्माण अधिकारी, आरोग्य विस्ताराधिकारी या कर्मचाºयांची मोठी जबाबदारी आहे. आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या बदल्यांसाठी समुपदेशनाची प्रक्रीया राबविली तर यासाठी कर्मचाºयांना जिल्हा परिषदेत यावे लागेल. या करीता आरोग्य विभागाच्या बदल्या पुढे ढकलल्या आहेत. आता आरोग्य विभागाच्या बदल्या केव्हा होणार याकडे लक्ष लागून आहे.
धुळे जि.प.तीलआरोग्य विभागाच्या बदल्या लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:04 PM