शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

भाजीपाला क्रेटमधून दारूची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 9:06 PM

शिरपूर : सव्वा लाखाच्या दारूसह मालेगावचे दोनजणांना घेतले ताब्यात

शिरपूर : भाजीपाला भरण्याच्या क्रेटमध्ये अवैधरित्या दारुचा साठा घेऊन जाणाºया पिकअप व्हॅनला शिरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने पकडले़ ही कारवाई शनिवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे़ १ लाख १२ हजाराच्या दारुसाठा, ५ लाखांची पिकअप व्हॅनसह मालेगाव येथील दोन जणांना ताब्यात घेण्यात आले़ मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील दहिवद पोलिस चौकीजवळ सांगवी पोलिसांनी नाकाबंदी केली होती़ सांगवीकडून येणारी एमएच ४१ एयू १५६७ क्रमांकाची पिकअप व्हॅन आल्यानंतर  पोलिसांनी तपासणी केली असता गाडीतील भाजीपाल्याचे रिकाम्या प्लॉस्टीक क्रेटखाली लपवलेले दारूचे खोके दिसून आले़ गाडीच्या तपासणीत १ लाख १२ हजार ३२० रूपये किंमतीची  देशी दारूचे ४५ खोके मिळून आलेत़ तसेच गाडीची किंमत ५ लाख रूपये, दीड हजाराचे क्रेट असा एकूण ६ लाख १२ हजार ३२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ चालकासह साथीदाराला जेरबंद करण्यात आले आहे़ मात्र त्या इसमाने गाडी घेवून दारू भरवून दिली तो इसम कोण या संदर्भात सांगवी परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे़पोलिस अधिक्षक चिन्मय पांडे, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिषेक पाटील, हवालदार लक्ष्मण गवळी, संजीव जाधव, योगेश दाभाडे, नियाज शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली़ याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ दरम्यान, मालेगांव येथील गाडी चालक सुनिल प्रकाश मगर (२८) व त्याचा साथीदार सुधीर हिरामण पवार (२१) हे दोघे टॅमाटो विकण्यासाठी मध्यप्रदेशात गेले होते़ ते विकून ते ९ रोजी संध्याकाळच्या सुमारास सांगवी गावाजवळ आले असतांना त्यांना मालेगाव येथील एकाचा मोबाईल आला़ चालक व साथीदार हे दोघे तेथे उतरून त्यांनी आलेल्या मोबाईल संभाषण प्रमाणे गाडी दुसºयाच्या ताब्यात देवून तेथेच थांबायला सांगितले़ अवघ्या एका तासानंतर सांगवी येथील एका अज्ञात व्यक्तीने त्या दोघांना गाडी ताब्यात देवून निघण्यास सांगितले़ नेमकी गाडी एक तास कुठे गेली? हे मात्र संबंधित चालकाला सांगता आले नाही़ गाडीत काय भरले हे देखील त्याला समजले नसल्याचे सांगण्यात आले़

टॅग्स :Dhuleधुळे