सोनगीर : येथील पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी दुपारच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्याच्या पुढे काही अंतरावर अवैध दारू साठा पकडला़ यात दोन आरोपी सोबत सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले़ शुक्रवारी दुपारी येथील पोलिसांना खेतीया कडून शिर्डी कडे वाहन क्रमांक एमएच ३९ डी ०३८८ यात अवैध दारूसाठा घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली़ माहिती मिळताच त्या आधारावर सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस हवालदार शामराव अहीरराव, पोलीस कर्मचारी विशाल सोनवणे, सुरज सावळे, सदेसिंग चव्हाण, शिरीष भदाणे, अतुल निकम आदी पोलिसांनी महामार्गावरील देवभाने फाट्याच्या पुढे बंद असलेल्या हॉटेल याचनाजवळ सापळा लावला होता़ हे वाहन येताच वाहनासहित दोन संशयित आरोपींना पकडण्यात आले़ या वाहनामध्ये बॉम्बे व्हिस्की नावाचे लेबल असलेले बेचाळीस बॉक्स मध्ये सुमारे अडीच लाखांचा अवैध दारु साठा हस्तगत करण्यात आला़ शिवाय तीन लाखांचे वाहन असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संशयित शिवाजी बाबूलाल चौधरी (वय २८, रा़ पडावद जि़ धुळे, ह़ मु़ रामनगर, शहादा) व नाना दयाराम पाटील (वय २३, रा़ खेतीया जि़ बडवानी) या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
सापळा लावून दारुसाठा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 10:51 PM